पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) जाया किंवा सप्तम भावावरील विचार. स० चिं० युवतिपदादाहं भार्यापति सूपदधिगुडक्षीरं ॥ आगमन गमन मदासि ब्यान्मूत्राशयंच नष्टधनं३६ ता० नी० छूने कलत्रवाणिज्यनष्टविस्मृतिसंकथा ॥ हृताऽध्य कलिमार्गादि चिंत्यं यूने ग्रहोऽशुभः॥३७॥ अर्थ-विवाह, स्त्रीच्या कुंडलीत भाचा विचार, पुरुषाच्या -कुंडलीत स्त्री विचार, सूप ( वरान), दहि, गुळ, दूध, जाणे, येणे, विषयसुख, मूत्राशय, वाणिज्य (दुकानदारी), नाहींशी झालेली वस्तु, विस्मृति, चोरीस गेलेले द्रव्य, मार्ग-विचार, कलह इत्यादि गोष्टींचा विचार लग्नापासून सप्तमस्थानावरून करावा.' मृत्यु किंवा अष्टम भावावरील विचार. स. चिं० मरणाजीवित मरणं गुह्यस्थानंच मरण हेतुंच ॥ अन्नसुखं भृतिदंशं परिभवमपि चिंतयेत्याज्ञः॥३८॥ ता० नी० मृत्यौ चिरंतनं द्रव्यं मृतवित्तं रणोरिपुः ॥ दुर्गस्थानं मृतिनष्टं परिवारो मनोव्यथा ॥ ३९ ॥ अर्थ-आयुष्य, मरण, गुस्थान, मरणाचे कारण, अन्नाचे सुख, पराभव, सादिकांचा दंश, प्राचीनद्रव्य, मृत्युपत्रांदिकांवरून मिळणारे द्रव्य, युद्ध, शत्रु, किल्ले, गेलेली वस्तु वगैरे गोष्टींचा विचार लग्नापासून अष्टमस्थानावरून करावा.