पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) कोणत्याच ग्रहाची स्थानदृष्टि नसतां त्याग्रहास शून्य मागग ग्रह अमें ह्मणतात. ग्रहाचें वक्र, अस्त, वार्धक्य, आणि बालत्व. नेहमी ग्रहांची गति सरळ ह्मणने मेष, वृषभ, मिथुन अशा क्रमाने व त्रिंशांशानेही ११२ अशा क्रमगतीने असते. जो ग्रह क्रमगतीने न जातां मागच्या त्रिंशांशाकडे येऊ लागतो त्यास वक्रीग्रह अस ह्यणतात. रवि आणि चंद्र हे कधीही वक्री होत नाहीत. बहुतकरून नेहमी प्रत्येक ग्रह कांही वेळ तरी दिसतो. तो रवीचें तेजाने दिसत नाहीसा झाल्यावेळी त्या ग्रहाचा अस्त ( लोप ) झाला आहे असें ह्मणतात. रवीचा अस्त कधीही होत नाही. चंद्राचा अस्त अमावस्येस व शुक्लप्रतिपदेस असतो. ग्रहाचा अस्त होण्याचे पूर्वीच्या काही कालास त्या ग्रहाचे वार्धक्य आणि उदय झाल्यानंतरच्या कांहीं कालास बाल्यत्व असें ह्मणतात. या दोन्ही स्थितीत त्या ग्रहाचें तेज कमी असून तो लहान असतो. गुरु, शुक्र व चंद्र यांचे बालत्व आणि वृधत्व यांचे दिवस. मु. ग. दशाहं पश्चिमे बाल्यं पंचाहं वार्धकं भृगोः ॥ प्राच्यांतु त्रिदिनं बाल्यं पक्षं वार्धक मुच्यते ॥२२॥ पक्षं बाल्यंच वार्धक्यं गुरोस्स्याऽयं शुभे सदा ॥ अर्धाहं बाल्य मब्जस्य वार्धकं त्रिदिनं विदुः॥२३॥ अर्थ-शुक्राचा पश्चिमेस उदय झाल्यानंतर?० दिवस बालत्व जाणा वें. शुक्राचा पश्चिमेस अस्त असतां अस्ताचे पूर्वी ५दिवस वृधख जाणावें शुक्राचा पूर्वेस उदय झाल्यानंतर ३ दिवस बालत्व जाणावें. शुक्राचा पूर्वेस असतां १५दिवस वृधत्व जाणावें.