पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) वहदा स्वद्रेष्काण स्वनवांशाऽधिकारो मध्यमः१७॥ स्वशत्रु स्वनीचाऽधिकारोऽधमः॥ एतत्स्थानत्रितयराहित्यं समाऽधिकारः ॥ १८॥ अर्थ-स्वगृही किंवा स्वोच्ची असणान्या ग्रहास उत्तमाधिकारी स्वहद्दीं, स्वद्रेष्काणी, किंवा स्वनवांशी असणाऱ्या ग्रहास मध्यमाधिकारी; स्वशत्रुस्थानी किंवा स्वनीचस्थानी असणाऱ्या ग्रहास अधमाधिकारी; आणि या तीनही अधिकारावांचून असणाऱ्या ग्रहास समाधिकारी ह्मणतात. अधिकाराचा निर्णय उत्तम आणि मध्यम या दोनी अधिकाराची एकत्र प्राप्ति असतां उत्तम अधिकार घ्यावा. मध्यम आणि अधम या दोनी अधिकाराची एकत्र प्राप्ति असतां मध्यम अधिकार घ्यावा. ग्रहांचीस्थानदृष्टि बल व तिचें फळ, ता० नी. दृष्टिः स्यान्नवपंचमे बलवती प्रत्यक्षतःस्नेहदा पादोनाऽखिलकार्यसाधनकरीमेलापकाऽख्योच्यते॥ गुप्तस्नेहकरी तृतीयभवभे कार्यस्य संसिधिदा त्र्यंशोना कथिता तृतीयभवने षड्भाग दृष्टिभवे ।१९॥ दृष्टिःपादमिता चतुर्थदशमे गुप्ताऽरि भावास्मृताऽ न्योन्यं सप्तममे तथैकभवने प्रत्यक्षवैराखिला ॥ दुष्टं दृत्रितयं क्षुताऽव्हयमिदं कार्यस्य विध्वंसद संग्रामादिकलिप्रदं दृशइमाःस्युर्दादशांशांतरे॥२०॥