पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिथ्यऽर्काऽष्टनगांऽकशैल खचराः सूर्यादिदीप्तांशकाः१४ अर्थ-सूर्याचे १५, चंद्राचे १२, मंगळाचे ८, बुधाचे ७, गुरूचे ९, शुक्राचे ७, शनीचे ९, हे दीप्तांश जाणावेत. स्पष्टीकरण. रवि-कोणत्याही राशीस १६ त्रिंशांशाचे आंत असतां तो आपल्या दीप्तांशाचे आंत आहे असें जाणावे. याच रीतीने इतर ग्रहाविषयी ही जाणावें. ग्रहांस शुभ पापसंज्ञा. म० जा० क्षयिचंद्र भौम रविजा राहुश्व पापामताः ॥ १५ ॥ अर्थ-क्षीणचंद्र, मंगळ, शनि व राहु हे क्रूर अथवा पापग्रह आणि रवि, बुध, गुरु, व शुक्र हे सौम्य अथवा शुभग्रह जाणावेत. क्षीणचंद्र. र ता० नी० टीका-कृष्णाष्टमी मारभ्य शुक्लाष्टमी पर्यंत मिति यावत्॥ कृष्णकादशीमारभ्य दर्शात क्षीण इति केचित्॥१६॥ अर्थ-कृष्णपक्षांतील ८ तिथि लागल्यापासून शुक्लपक्षांतील अमी तिथि लागे पर्यंतच्या चंद्रास क्षीणचंद्र ह्मणावा. कृष्ण ११ तिथि लागल्यापासून अमावस्यासंपे पर्यतच क्षीणचंद्र जाणावा असे "केचिन्मत" आहे. ग्रहांचे अधिकार. ता. नी. टीका-स्वग्रहं स्वोच्चाधिकार श्रोत्तमः ॥