पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. - स्वस्त्रीचे ठायीं असंतुष्ट, अजितेंद्रिय, विपरीत बुद्धीच्या, चंचल मनाचे पुरुषास परस्त्रिया अपकीर्तीस पोंचवितात. १०. अत्येति रजनी या तु सा न प्रतिनिवर्तते । यात्येव यमुना पूर्ण समुद्रमुदकार्णवम् ॥ २॥१०५।१९ जी रात्र ( एकदां ) निघून जाते, ती पुनः परत येत नाही. उदकाने परिपूर्ण भरलेल्या समुद्राकडे यमुना नदी जाते ( ती कधी मागे परतून येत नाही). ११. अथवा किं ममैतेन राज्यद्रव्यमयेन तु । उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति ॥२२२।२८ अथवा राज्यप्राप्तिदायक अशा ह्या अभिषेकजलाने तरी मला काय कर्तव्य आहे ? स्वतः हाताने काढिलेलें उदकच मला ( तपाच्या ) व्रताधिकारास पात्र करील. १२. अथात्मपरिधानार्थ सीता कौशेयवासिनी । 2. संप्रेक्ष्य चीरं संत्रस्ता पृषती वागुरामिव ॥२॥३७।९ नंतर (कैकेयीने) परिधानार्थ दिलेले वल्कल पाहून त्या सर्वदा पीतांबर धारण करणाऱ्या सीतेची, पाश पाहून त्रस्त होणाऱ्या, हरिणीसारिखी स्थिति झाली. १३. अधर्मः सुमहान्नाथ भवेत्तस्य तु भूपतेः। यो हरेदलिषड्भागं न च रक्षति पुत्रवत् ॥३।६।११ हे नाथ ! जो राजा प्रजेपासून त्यांच्या उत्पन्नाचा षष्ठांश-सहावा भाग-करभार म्हणून घेऊन त्यांचे पुत्रवत् पालन करीत नाही, तो त्याचा मोठा अधर्म होय. १४. अधर्षितानां शूराणां समरेष्वनिवर्तिनाम् ।। धर्षणामषणं भीरु मरणादतिरिच्यते ॥४।१६।३ हे भीरु ! परोत्कर्ष सहन न करणारे व समरांत माघार न घेणारे, अशा शूरांना शत्रूचा अपमान सहन करणे म्हणजे मरणाहूनही अधिक आहे. १५. अनभिज्ञाय शास्त्रार्थान्पुरुषाः पशुबुद्धयः । प्रागल्भ्याद्वक्तुमिच्छन्ति मन्त्रिप्वभ्यन्तरीकृताः॥६।६३१४ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri