पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. rammar । मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले पशुबुद्धि पुरुष आपल्या अंगच्या बोलकेपणाच्या जोरावर अनभिज्ञास-अज्ञान्यास-शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात. १६. अनवस्थौ हि दृश्येते युद्धे जयपराजयौ ॥५॥३७५५ । युद्धामध्ये जय काय किंवा पराजय काय, हे अनिश्चित असतात. १७. अनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता । आपदाशङ्कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥३॥२४।११ कल्याण इच्छिणाऱ्या विद्वान् पुरुषाने पुढे विपत्ति येईल, अशी शंका येतांच, ती विपत्ति प्राप्त होण्यापूर्वीच परिहाराची योजना करावी. १८. अनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्वापराजयम् । कार्यसिद्धिकराण्याहुस्तस्मादेतद्रवीम्यहम् ॥४।४९।६ उत्साह, दक्षता, आणि कार्याविषयी उन्मुखता, ही कार्यसिद्धि घडवून आणितात, असे म्हणतात, म्हणून हे मी सांगतो. १९. अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम् ॥५।१२।१० । उत्साह हे संपत्तीचे कारण होय, आणि उत्साह म्हणजेच परम सुख होय. २०. अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः । करोति सफलं जन्तोः कर्म यच्च करोति सः ॥५।१२।११ सर्वार्थांचा प्रवर्तक म्हणजे उत्साह होय; प्राणी जे काही कर्म करितो, तें त्याचे कर्म हाच उत्साह सफल करितो. २१. अनुबन्धमजानन्तः कर्मणामविचक्षणाः । शीघ्रमेव विनश्यन्ति यथा त्वं विनशिष्यसि ॥३॥५१॥२६ कर्माचे फल न जाणणारे मूर्ख लोक, जसा तूं नाश पावणार आहेस, त्याप्रमाणे (तें कर्म करून ) शीघ्र नाश पावतात. २२. अनृतं नोक्तपूर्व मे न च वक्ष्ये कदाचन । एतत्ते प्रतिजानामि सत्येनैव शपाम्यहम् ॥ ४।७।२२ आजपर्यंत मी पूर्वी कधी अनृत भाषण केले नाही, आणि पुढेही कधी करणार नाही, हे मी तुला प्रतिज्ञेनें सांगतो, व यासंबंधी सत्याची शपथ वाहतो. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri