पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ८३ मित्रांचे शाश्वत कल्याण इच्छिणाऱ्या बुद्धिमान् व समर्थ पुरुषाने त्यां ( मित्रां )च्या संकटप्रसंगी उपदेश करणे योग्य आहे. ४९३. सूक्ष्मः परमविज्ञेयः सतां धर्मः प्लवङ्गम । हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥ ४।१८।१५ हे वानरा ! सज्जनांचा धर्म सूक्ष्म असून इतरांना दुर्जेय आहे. सर्व प्राणिमात्रांच्या हृदयप्रदेशी असणारा ईश्वरच केवळ सर्व शुभाशुभ जाणतो. ४९४. सौमित्रे योऽभिषेकार्थे मम संभारसंभ्रमः । _____ अभिषेकनिवृत्त्यर्थे सोऽस्तुसंभारसंभ्रमः ।।२।२२।५ सौमित्रे ( लक्ष्मणा )! जशी प्रथमतः माझ्या अभिषेकाकरितां जोराने तयारी केली होती, तशीच ती आतां माझ्या अभिषेकनिवृत्तीसमयींही असावी, ४९५. स्त्रिया भर्ता हि दैवतम् ।। २।३९।३१ पति म्हणजे स्त्रियांचे दैवतच होय. ४९६. स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥ २॥३९।२४ स्त्रियांचें एक पातिव्रत्यच त्यांस परम विशेषत्व देणारे आहे. ४९७. स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं न भिद्यते यद्भुवि नो विदीर्यते । अनेन दुःखेन च देहमर्पित ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ॥ २।५१ भमीवर पतन पावलें असतांही विदीर्ण होत नाही, त्याअर्थी माझे हे हृदय लोखंडाचेच निर्माण केले आहे, असे वाटते. ह्या एवढ्या दुःखाने देह व्याप्त झाला असून तो भेद पावत नाही, त्यावरून ( मनुष्याला ) अकाली मृत्यू येत नाही, हीच गोष्ट सत्य होय. ४९८. स्निग्धस्य भजमानस्य युक्तमाय कल्पितुम् ॥ ७।२५।४९ स्नेहभावाने भजणा-याचे अर्थसिद्धयर्थ साहाय्य संपादणे योग्य आहे. ४९९. स्वर्गों धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च । गुरुवृत्त्यनुरोधेन न किंचिदपि दुर्लभम् ॥ २॥३०॥३६ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri