पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ सार्थश्रीरामायणसुभाषितानि. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . गुस्वृत्तीच्या अनुरोधाने वागणाऱ्याला धन, धान्य, विद्या, पुत्र, आणि सर्व प्रकारची सुखें प्राप्त होतात, त्यास दुर्लभ असें कांहींच नसते. ५००. स्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण । रक्ष्यमाणा न वर्धन्ते मृगा गोमायुना यथा ।। ३।४१।१४ घातकी ( व्याध वगैरे ) जीवाकडून रक्षण केले गेलेले मृग जसे वृद्धि पावत. नसतात, त्याचप्रमाणे प्रजांशी प्रतिकूल वागून राजा जर तीक्ष्ण दंडाने त्यांचे रक्षण, करील, तर त्या प्रजा ( कधीही) वृद्धिंगत होणार नाहीत. ५०१. हंसो यथा राजतपञ्जरस्थः सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः । वीरो यथा गर्वितकुञ्जरस्थ... श्चन्द्रोऽपि बभ्राज तथाम्बरस्थः ॥ ५।५।४ रौप्यमय पिंजऱ्यांत जसा हंस, मंदरपर्वतावरील गुहेत जसा सिंह, मदोन्मत्त हत्तीवर जसा वीर, त्याप्रमाणे चंद्र आकाशांत शोभत होता. ५०२. हित्वा धर्म तथार्थं च कामं यस्तु निषेवते । स वृक्षाग्रे यथा सुप्तः पतितः प्रतिबुध्यते ॥ ४॥३८।२२ जो ( राजा ) धर्म आणि अर्थ यांचा त्याग करून केवळ कामसेवन करितो, त्याची स्थिति वृक्षाच्या अग्रभागी निजलेला मनुष्य खाली पडून जागा होतो, त्याच्या स्थिति प्रमाणे होते. ( राज्यभ्रष्ट झाल्यावर स्थितीवर येतो.) TWAIILLHIT समाप्त. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri