पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. रामा! ज्या पुरुषांच्या जीवितावर दुसरे आपलें जीवित चालवितात. त्या पुरुषाचे जीवित धन्य होय. तसेच ज्या पुरुषाचे जीवित दुसऱ्यावर अवलंबून असते, ते जीवित दुःखावह होय. ४८९. सुनीतं हितकामेन वाक्यमुक्तं दशानन । न गृह्णन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः ॥६।१६।२० हे दशानना ! अकृत बुद्धीचे लोक कालवश झाले असतां हितबुद्धि मनुष्याचे नीतियुक्त भाषणही ग्रहण करीत नाहीत. ४९०. सुमुखं दुर्मुखी रामं वृत्तमध्यं महोदरी। विशालाक्षं विरूपाक्षी सुकेशं ताम्रमूर्धजा ॥३॥१७९ प्रियरूपं विरूपा सा सुस्वरं भैरवस्वना । तरुणं दारुणा वृद्धा दक्षिणं वामभाषिणी ॥३।१७।१० न्यायवृत्तं सुदुर्वृत्ता प्रियमप्रियदर्शना । शरीरजसमाविष्टा राक्षसी राममब्रवीत् ।। ३।१७।११ राम सुंदर मुखाचा, तर ती दुर्मुखी; राम कृश उदराचा, तर ती महोदरी; राम विशालाक्ष, तर ती विरूपाक्षी; राम सुंदर केशांचा, तर ती ताम्रकेशी; राम सुस्वरूप, तर ती कुरूप; रामाचा सुस्वर, तर तिचा कर्कश स्वर; राम तरुण तर ती क्रूर व वृद्ध; राम चतुर भाषण करणारा, तर ती दुर्भाषण करणारी; राम न्यायाने वागणारा, तर ती अत्यन्त दुर्वृत्त; राम सर्वांस प्रिय, तर ती सर्वांस अप्रियदर्शन; अशी ती कामपीडित राक्षसी रामाला बोलली. ४९१. सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः । __अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥ ३॥३७।२ हे राजा ! ( हिताहित विचार न करितां केवळ ) सतत मधुर भाषण करणारे पुरुष सुलभ आहेत; परंतु अप्रिय असले, तरी अंता हितकर असें बोलणारे व ऐकणारे दुर्लभ होत. ४९२. सुहृदामर्थकृच्छेषु युक्तं बुद्धिमता सदा । समर्थेनोपसंदेष्टुं शाश्वती भूतिमिच्छता ॥ ६।१७।३३ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri