पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ४८३. सहस्राण्यपि मूर्खाणां ययुपास्ते महीपतिः । अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ॥२।१००।२३ एकोऽप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः । राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ।।२।१००।२४ राजा जर आपल्या आश्रयाखाली हजारों अथवा अनेक अयुत (अयुत-दहाहजार ) मूखीना ठेवील, तर त्यांपासून त्याला कोणत्याही प्रकारे सहाय्य होणार नाही. ( उलट) ज्या राजाजवळ एकच बुद्धिवान् , शूर, दक्ष आणि शहाणा अमात्य असेल तो अमात्य राजा अथवा राजपुत्र, यांस मोठ्या ऐश्वर्यास पाववील. '४८४. सहैव मृत्युचेजति सहमृत्युनिषीदति ।। गत्वा सुदीर्घमध्वानं सहमृत्युर्निवर्तते ।। २।१०५।२२ प्राण्याबरोबर मृत्यु जातो, त्याबरोबर तो बसतो, आणि त्याबरोबरच अत्यंत दीर्घ -मार्ग चालून माघारा फिरतो. ४८५. सागरं चाम्बरप्रख्यमम्बरं सागरोपमम् । रामरावणयोयुद्धं रामरावणयोरिव ॥ ६।१०७।५१ सागर आकाशासारखा आहे तसें आकाश सागरासारखे आहे. परंतु रामरावणाचे युद्ध म्हणजे रामरावणांसारखेच होय ( त्याला उपमाच नाही.) ४८६. सापराधोऽपि बालो हि रक्षितव्यः स्वबान्धवैः।।७।१३।२० ____ कोणी बाल-अज्ञानी-अपराधी असला, तरी त्याचे बांधवांनी रक्षण करणे योग्य आहे. ४८७. सीताहरणजं दुःखं न मे सौम्य तथागतम् । यथा विनाशो गृध्रस्य मत्कृते च परंतप ॥ ३॥६८।२५ हे शत्रदमना ( लक्ष्मणा ) ! माझ्या कारणाने झालेला हा गृध्राचा विनाश जितका मला दुःखदायक वाटत आहे, तितकें सीतावियोगापासून झालेले दुःख मला वाटत नाही. ४८८. सुजीवं नित्यशस्तस्य यः परैरुपजीव्यते । राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥ २॥१०५७ CCS Al chiaradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri