पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• सार्थश्रीरामायणसुभाषितानि. हे सौमित्रे ( लक्ष्मणा ) ! धर्माचरण करणारे, शूर आणि शरणागतांचे रक्षण करणारे असे साधुशील तिर्यग्योनीतही सर्वत्र दिसून येतात. ४७८. सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् । अनित्यत्वात्तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते ॥ ४॥३२७ मित्रत्व संपादणे सुलभ आहे, परंतु त्याचे प्रतिपालन करणे-ती मैत्री राखणेंअत्यंत कठीण आहे. मनाचे अनित्यत्वामुळे यत्किंचितही कारणाने त्या मित्रप्रेमाचा नाश होतो. ४७९. सर्वदा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः । तव तद्वदयं मृत्यु मैथिलीकृतलक्षणः ॥ ६।११।२९ सर्व प्राण्यांस सर्वकाळी निमित्तावांचून मृत्यु नाही त्यापमाणे तुला हा आलेला मृत्यु जानकीनिमित्त आहे. ४८०. सर्वेक्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः । संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् ॥ ७॥५२।११ तस्मात्पुत्रेषु दारेषु मित्रेषु च धनेषु च । नातिप्रसङ्गः कर्तव्यो विप्रयोगो हि तैध्रुवम् ॥ ७५२।१२ सर्व ऐश्वर्यांचा शेवट नाशांत होतो ? उच्चत्वाचा शेवट पतनांत होतो, संयोगाचा शेवट वियोगांत होतो, आणि जीविताचा शेवट मरणांत होतो. म्हणून पुत्र, स्त्री, मित्र धनसंपत्ति यांच्या ठिकाणी अत्यासक्ति करूं नये. त्यांचा वियोग हा व्हावयाचाच, ४८१. सर्वे चण्डस्य बिभ्यति ॥ ६।२।१९ जो अत्यंत क्रोधिष्ठ असतो, त्याला सर्व भितात. ४८२. स सुहृयो विपन्नार्थ दीनमभ्युपपद्यते । स बन्धुर्योऽनीतेषु साहाय्यायोपकल्पते ॥ ६।६३।२७ ज्याचा कार्यभाग नष्ट झाला आहे, अशा दीन जनांवर जो उपकार करितो, तोच सुहृद् होय. तसेंच अनीतिमार्गी असणाऱ्या जनास सहाय्य करण्याविषयीं जो समर्थ होतो, तोच बंधु होय.. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri