पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. -~-~ -~~ -~ ~-wwe - कन्येचा पिता हा पृथ्वीवर इंद्रासारखा असला, तरी तो आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्याहून कमी प्रतीच्या लोकांकडून अपमान पावत असतो. ४७०. सन्तश्चारित्रभूषणाः ।। ६।११३।४२ सज्जनांचे भूषण म्हणजे त्यांचे चारित्र्य होय. ४७१. संनिकर्षाच्च सौहार्द जायते स्थावरेष्विव ॥ २।८।२८ संनिधानाने ( तृणलता इत्यादि ) स्थावर पदार्थांमध्येही सुहृद्भाव उत्पन्न होतो. ४७२. स भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् । तदन्नमपि भोक्तव्यं जीयते यदनामयम् ॥ ३॥५०।१८ हे सौम्या ! जो भार मनुष्यास चिरडूं शकणार नाही, तो धारण करावा. तसेच जें अन्न रोग उत्पन्न न करतां जिरेल तेंच भक्षण करावें. ४७३. समुत्पतितमेघस्य वीचिमालाकुलस्य च । विशेषो न द्वयोरासीत्सागरस्याम्बरस्य च ॥ ६।४।१२० गगनांतील मेघ व सागरांतील तरंगमाला यांतील परस्पर सादृश्यामुळे आकाश व सागर या दोहोंत फरक दिसत नाही. ४७४. संपृष्टेन तु वक्तव्यम् ॥ ३।४०९ विचारले असतां बोलावें. ४७५. संप्राप्तमवमानं यस्तेजसा न प्रमाजेति । कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पचेतसः ॥ ६।११५।६. प्राप्त झालेल्या अपमानाचे स्वतःच्या सामर्थानें जो प्रमार्जन करीत नाही, त्या अद्र अंतःकरणाच्या पुरुषाच्या मोठ्या पराक्रमाने काय अर्थ सिद्ध होणार ? ४७६. सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादा सत्यमन्वितः । सत्यानुरोधात्समये वेलां स्वां नातिवर्तते ॥ २।१४।६ समुद्र सत्यव्रत असल्या कारणाने सत्याचा त्याग होईल, या भीतीने (चंद्रोदयकाली ) स्वल्प मर्यादा उल्लंध्य असूनही तो तिचे उल्लंघन करीत नाही. ४७७. सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः । शूराः शरण्याः सौमित्रे तिर्यग्योनिगतेष्वपि ॥३॥६८।२४ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri