पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ४५०. शुष्ककाष्ठैभवेत्कार्य लोष्टैरपि च पांसुभिः। न तु स्थानात्परिभ्रष्टैः कार्य स्याद्वसुधाधिपैः ।।३।३३।१८ . शुष्क काष्ठांनी, मातीच्या ढेकळांनी, तसेंच रजःकणांनीही कार्य होतात. परंतु राजा एकदां स्थानभ्रष्ट झाला म्हणजे त्याजपासून कोणतेही कार्य होत नाही. ४५१. शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च रणाजिरे । कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः॥३॥६९।५० शूर असोत, बलवान् असोत, अथवा रणभूमीवर अस्त्रविद्यानैपुण्य दाखविणारे असोत, कालाने व्याप्त झाले असतां ते वाळूच्या सेतू प्रमाणे नाश पावतात. ४५२. शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च।। ___अपोह्य रामं कस्माच्चिदारचौर्य त्वया कृतम् ॥ ५।२२।२२ तूं शूर आहेस, कुबेराचा बंधु आहेस, तुजजवळ सैन्यही विपुल आहे असे असतां रामाला दूर नेऊन त्याच्या भार्येचे हरण कां बरें केलेंस ? ४५३. शोकश्च किल कालेन गच्छता ह्यपगच्छति । मम चापश्यतः कान्तामहन्यहनि वर्धते ॥ ६।५।४ काल जसजसा जातो, तसतसा शोक निघून जातो. ( असे आहे तरी ) कांता सीता-दृष्टीस पडत नसल्यामुळे माझा शोक दिवसेंदिवस वाढत आहे. ४५४. शोकः सर्वार्थनाशनः ॥ ६।२।१७ शोक हा सर्वार्थांचा नाशक आहे. ४५५. शोकेनाभिप्रपन्नस्य जीविते चापि संशयः ॥ ४७१३ शोकानें मनुष्य व्याप्त झाला असतां जीविताविषयी ही संशय असतो. ४५६. शोको नाशयते धैर्य शोको नाशयते श्रुतम् । शोको नाशयते सर्व नास्ति शोकसमो रिपुः ॥२।६२।१५ शोक धैर्याचा नाश करितो, शोक ( शिकलेल्या ) शास्त्रविद्येचा नाश करितो, शोक सर्वांचा नाश करितो. म्हणून शोकासारखा दुसरा शत्रु नाही. ४५७. शोच्यस्त्वमसि दुर्बुद्धे निन्दनीयश्च साधुभिः। यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ ६१८७।१३ - CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri