पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५ सार्थश्रीरामायणसुभाषितानि. mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm१७:४४, २५ ऑगस्ट २०२० (IST)~~ ४४५. शतयोजनविस्तीर्णः सागरो मकरालयः। विक्रमश्लाघनीयेन क्रमता गोष्पदीकृतः ॥ ५॥३६८ मकरांचे वसतिस्थान, तसेंच शंभरयोजनें विस्तीर्ण अशा समुद्राचे उल्लंघन करून तूं त्याला गोष्पदासमान केलेस, त्याअर्थी तुझा परक्राम अत्यंत वर्णनीय आहे. ४४६. शरार्चिषमनाधृष्यं चापखगेन्धनं रणे । रामाग्निं सहसा दीप्तं न प्रवेष्टं त्वमहसि ॥ ३॥३७१५ सहसा प्रदीप्त झालेल्या ह्या रामरूप अग्नीमध्ये तूं प्रवेश करूं नये. तीक्ष्ण बाण हे त्या अग्नीच्या ज्वाला असून धनुष्य व खड्ग ही त्या अन्नाची इंधन होत, ह्या अग्नीचा विनाश करणे शक्य नाही. ४४७. शिलातलं प्राप्य यथा मृगेन्द्रो महारणं प्राप्य यथा गजेन्द्रः । राज्यं समासाद्य यथा नरेन्द्र स्तथा प्रकाशो विरराज चन्द्रः ॥ ५।५।७ शिलातलावर प्राप्त झालेला सिंह, मोठ्या रणांगणावर येऊन ठेपलेला गजश्रेष्ठ, राज्यप्राप्ति झालेला नरपति जसे शोभतात त्याप्रमाणे ह्या वेळी प्रकाशमान झालेला चंद्र शोभत होता. ४४८. शुभं वा यदि वा पापं यो हि वाक्यमुदीरितम् । सत्येन प्रतिगृह्णाति स वीरः पुरुषोत्तमः ॥ ४॥३०/७२ (पुरुषाने) शुभ किंवा अशुभ वाक्य एकदा उच्चारिले असतां तें व्यर्थ जाऊ न देतां त्याचा खरेपणाने जो स्वीकार करितो, तो पुरुषश्रेष्ठ होय.. ४४९. शुभकृच्छुभमाप्नोति पापकृत्पापमश्नुते । विभीषणः सुखं प्राप्तस्त्वं प्राप्तः पापमीदृशम् ॥६।१११।२६ पुण्यकर्म करणाऱ्याला कल्याणप्राप्ति होते, तर पापकर्म करणाऱ्याला पाप फल भोगावे लागते. बिभीषणाला सुखाची प्राप्ति झाली, आणि ( त्याच्या उलट ) तूं अशा पापस्थितीला पावला आहेस.. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri .