पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ত हे दुर्बुद्धे ! ज्या अर्थी स्वजनाचा त्याग करून तूं परक्याचा दास झाला आहेस, त्याअर्थी तुझी स्थिति शोचनीय झाली असून तूं सज्जनांच्या निंदेस पात्र झाला आहेस. ४५८. श्रूतये हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः । संनिकादिषीकाभिर्मोचितः परमाद्भयात् ॥ २।८।३० अशी गोष्ट ऐकण्यांत आहे की, कोणी वनजीवी लोक एक वृक्ष तोडण्यास गेले. परंतु त्या वृक्षासभोवती कंटकयुक्त झुडपांचे दाट वेष्टण असल्यामुळे त्यांस तो वृक्ष तोडतां येईना आणि अशा रीतीनें तो वृक्ष ( छेदन ) भयापासून मुक्त झाला. ४५९. षट्पादतन्त्रीमधुराभिधानं प्लवङ्गमोदीरितकण्ठतालम् । आविष्कृतं मेघमृदङ्गनादै वनेषु संगीतमिव प्रवृत्तम् ॥ ४॥२८॥३६ आज वनांमध्ये मधुर गायनच चालू झाले आहे काय, असे वाटत आहे. ह्या गायनांत भ्रमररूप वीणा असून भेकांचा शब्द हा त्यांतील ताल आहे. आणि मेघांचा नाद हा त्यांतील प्रकट झालेला मृदंग स्वर आहे. ४६०. संश्रुत्य च न शक्ष्यामि जीवमानः प्रतिश्रवम् । . मुनीनामन्यथाकर्तुं सत्यमिष्टं हि मे सदा ॥ ३।१०।१७ मुनींजवळ केलेली प्रतिज्ञा जीवंत असें तोपर्यंत अन्यथा करण्याविषयी मी समर्थ नाही. कारण सर्व काळ मला सत्य प्रिय आहे. ४६१. सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम् । लुब्धं न वहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥ ३॥३३॥३ । जो राजा ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होऊन मनास येईल, तसे वर्तन करणारा आणि लोभी असतो, त्यास प्रजा स्मशानांतील अग्नीप्रमाणे अनादरणीय समजतात. ४६२. संजीवितं क्षिप्रमहं त्यजेयं विषेण शस्त्रेण शितेन वापि । CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri