पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. सांप्रत पक्षी लीन झाले आहेत, सूर्यविकासी कमलें मिटली आहेत, आणि मालती प्रफुल्लित झाली आहे, यावरून सूर्य अस्तास गेला आहे असे समजतें. ४३९. विव्यथे भरतो तावत्रणे तुद्येव मूचिना ॥ २७५।१७ भरत, तीव्र व्रणाचे ठिकाणी सुईने टोचावे, त्याप्रमाणे व्यथित झाला. ४४०. विषादनक्राध्युषिते परित्रासोर्मिमालिनि । किं मां न त्रायसे मनां विपुले शोकसागरे ॥ ३।२१।१२ दुःखरूप नक्रांची ज्यांत वसती आहे; आणि ज्यांवर त्रासरूप लाटा उसळत आहेत; अशा महाशोकसागरांत मग्नझालेल्या माझा उद्धार तूं का बरे करीत नाहींस ? ४४१. व्यसने वार्थकृच्छे वा भये वा जीवितान्तगे । विमृशंश्च स्वया बुद्धया धृतिमान्नावसीदति ॥४७९ संकटकाली, धनाच्या विनाशसमयीं, भय प्राप्त झाले असतां, अथवा जीविताच्या नाशप्रसंगी जो धैर्यवान् मनुष्य स्वतःच्या बुद्धीने विचारपूर्वक वागतो, तो क्लेश । पावत नाही. ४४२. व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा । भतारं नानुवर्तेत साच पापगतिभवेत् ॥ २।२४।२६।। जी उत्तम स्त्री व्रतोपवासादि नियमांच्या ठिकाणी आसक्त होऊनही पतीच्या आज्ञेनुसार वागत नाही, तिला पापगति प्राप्त होते. ४४३. शक्यमापतितः सोढुं प्रहारो रिपुहस्ततः। सोढुमापतितः शोकः सुसूक्ष्मोऽपि न शक्यते ॥२॥६२।१६ शत्रूच्या हातचा प्रहार सहन करणे शक्य आहे. परंतु प्राप्त झालेला अतिसूक्ष्मही शोक सहन करणे शक्य नाही. ४४४. शक्या लोभयितुं नाहमैश्वर्येण धनेन वा । - अनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा॥५।२१।१५ ऐश्वर्याने अथवा धनाने मला लोभविणे शक्य नाही. सूर्याशी प्रभा जशी अनन्य आहे, त्याचप्रमाणे मी रामाशी अनन्य आहे. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri