पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. रक्षता तु मया वृत्तमपवादं च सर्वतः।। प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्गं च परिमार्जता॥६।११५।१६ जो हा रणाचा खटाटोप मित्रांच्या वीर्येकरून मी पार पाडला, तो तुला विदित असो. तो मी तुजकरितां केला नाही. तुझें कल्याण असो. माझे शीलाचे रक्षण, सर्वत्र जनापवादाचा निरास, आणि आपल्या प्रख्यात वंशास आलेल्या काळिम्याचे निरसन करणे, इतक्याचकरितां हे सर्व मी केले आहे. ४३४. विद्यते गोषु संपन्नं विद्यते ज्ञातितो भयम् । विद्यते स्त्रीषु चापल्यं विद्यते ब्राह्मणे तपः॥६१६९ गाईचे ठिकाणी ( हव्यकव्यादि) संपन्नता आहे, ज्ञातीचे ठिकाणी भीति आहे, स्त्रियांचे ठिकाणी चापल्य आहे, आणि ब्राह्मणांचे ठिकाणी तप आहे. ४३५. विनाशयन्ति भारं सहिताः शत्रुभिबुधैः। विपरीतानि कृत्यानि कारयन्तीह मन्त्रिणः ॥ ६।६३।१७ ___ दुमंत्री धन्याचा-राजाचा-नाश व्हावा, या हेतूने बुद्धिमान् शत्रूला अनुकूल होऊन त्या राजाकडून विपरीत कृत्ये करवितात.. ४३६. विनाशे बहवो दोषा जीवन्प्राप्नोति भद्रकम् । तस्मात्प्राणान्धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमः॥५।१३।४५ मरण्यांत अनेक दोष असतात, आणि जगण्यांत कल्याणप्राप्ति होणारी असते, म्हणून मी प्राणधारण करीन. ( अशानें ) रामादिकांचा निश्चित समागम होणारा आहे. ४३७. विनीतविनयस्यापि प्रकृतिर्न विधीयते । प्रकृतिं गृहमानस्य निश्चयेन कृतिधुवा ॥७।५९५ २।२६ ज्याला विनयाचे शिक्षण मिळाले आहे, त्यालाही मूळस्वभाव टाकितां येत नाही: मूळस्वभाव ताब्यांत ठेवणाऱ्याची कृति निश्चय करून निश्चल असते. ४३८. विलीयमानविहगैनिमीलद्भिश्च पङ्कजैः । विकसन्त्या चमालत्या गतोऽस्तं ज्ञायते रविः॥४।२८।५२ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri