पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ सार्थश्रीरामायणसुभाषितानि. mmmmmwwwwwww ( स्त्रियांचे ) ध्यान करीत आहेत, मोर नाचत आहेत, आणि वानर ( सुग्रीवाच्या जयप्राप्तीने ) समाधान पावत आहेत. ४२८. वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित् ।। नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नावाच्यं विद्यते कचित् ॥५॥५५॥५ अतिशय क्रुद्ध झालेला मनुष्य बोलावें काय, आणि नाहीं बोला काय, हे जाणत नाही. क्रुद्ध मनुष्याला अकार्य असे काही नाही, आणि अवाच्य असेंही काही नाही. ४२९. वामः कामो मनुष्याणां यस्मिन्किल निबध्यते । जने तस्मिंस्त्वनुक्रोशः स्नेहश्च किल जायते ॥ ५।२२।४ हा मनुष्यांचा काम दुष्ट आहे. क्रोधपात्र मनुष्याचे ठिकाणी हा जडला, तर त्याविषयी सुद्धा मनुष्याचे मनांत स्नेह व दया ही उत्पन्न होतात. ४३०. वाहि वात यतः कान्ता तां स्पृष्टा मामपि स्पृश । त्वयि मे गात्रसंस्पर्शश्चन्द्रे दृष्टिसमागमः ॥ ६।५।६ वायो ! ज्या ठिकाणी माझी कांता आहे, तेथें जा, आणि तिला स्पर्श करून ये; नंतर मला स्पर्श कर. दृष्टीस चंद्रसमागम जसा तापशामक होतो, त्याचप्रमाणे तूं मला हो. ४३१. विक्लवो वीर्यहीनो यः स दैवमनुवर्तते । वीराः संभावितात्मानो न दैवं पर्युपासते ॥२।२३।१३ .. जो दीन आणि पराक्रमहीन असतो, तो दैवाच्या मागे लागतो. ( शौर्यादि गुणांनी लोकांत ) सन्मान्य असे वीर पुरुष दैवाची उपासना करीत नाहीत. ४३२. विगर्हितं च नीचं च कथमार्योऽभिधास्यति । त्राहीति वचनं सीते यस्त्रायेत्रिदशानपि ॥ ३॥५९।११ हे सीते; जो देवांचेही रक्षण करू शकेल तो राम लक्ष्मणा ! माझें संरक्षण कर, असें निंद्य आणि नीच भाषण कसे बरे करील ? ४३३. विदितश्चास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः। सुतीर्णः सुहृदां वीयर्यान्न त्वदर्थ मया कृतः॥६।११५।१५ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri