पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ७१ चंद्रापासून लक्ष्मी-शोभा-कदाचित् निघून जाईल; कदाचित् हिमाचल हिमाचा त्याग करील, सागरही एखादे वेळी मर्यादेचे उल्लंघन करील, परंतु मी पित्याच्या प्रतिज्ञेचे कधीही उल्लंघन करणार नाही. ४२२. लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः । अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा ॥ ५।२५।१२ स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, अकाली मृत्यु येणें दुर्लभ होय, हा विद्वानांच्या तोंडचा लोकप्रवाद सत्य आहे. ४२३. वक्तव्यतां च राजानो वने राज्ये व्रजन्ति च ॥ ७४३६ (विचारहीन ) राजे वनांत आणि राज्यांतही लोकांच्या निंदेस पात्र होतात. ४२४. वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता ।। ४।१८।२९ धर्ममार्गी रहाणाऱ्यांने मित्रजनांवर उपकार करावा. ४२५. वर्जयेद्वज्रमुत्सृष्टं वर्जयेदन्तकश्विरम् । त्वद्विधं नतु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः ॥ ५।२१।२३ .. तुजवर सोडलेले वज्र तुझा कदाचित् प्राणनाश करणार नाही. कदाचित् यमही तुझा नाश चिरकाल करणार नाही. परंतु क्रुद्ध झालेला लोकनाथ राम तुझ्यासारख्याचा प्राणघात केल्याशिवाय रहाणार नाही. ४२६. वसेत्सह सपत्नेन क्रुद्धनाशीविषेण च । न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ॥ ६।१६।२ . . शत्रूशी सहवास करावा. क्रुद्ध झालेल्या सर्पाशीही वास करावा. परंतु शत्रुपक्षाने वागणाऱ्या नामधारी मित्राशी कधीही सहवास करूं नये. ४२७. वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति । 2. ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति । नद्यो घना मत्तगजा वनान्ता प्रियाविहीनाः शिखिनः प्लवङ्गमाः॥४।२८।२७ सांप्रतकाली नद्या वहात आहेत. मेघ वृष्टि करीत आहेत. मदोन्मत्त हत्ती आनंदाने गर्जना करीत आहेत. वनान्तभाग सुशोभित दिसत आहेत. प्रियाविरहित जन CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri