पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० सार्थश्रीरामायणसुभाषितानि. wwwwwwwwww . ..IN. राजा (प्रजांची ) माता, त्याप्रमाणे पिताही आहे. राजा प्रजांचे हितकरणारा आहे. ४१७. राजैव कर्ता भूतानां राजा चैव विनायकः । राजा सुप्तेषु जागर्ति राजा पालयति प्रजाः॥७.५९ प्र.२।४ राजाच सर्व भूतांचा कर्ता असून, त्यांचा मोठा नायकही तोच आहे. सर्व लोक निजले असतां राजा जागतो, आणि प्रजापालन करितो. ४१८. राज्यं भ्रष्टं वनेवासः सीता नष्टा मृतो द्विजः । ईदृशीयं ममालक्ष्मीदहेदपि हि पावकम् ॥३॥६७।२४ संपूर्णमपि चेदय प्रतरेयं महोदधिम् । सोऽपि नूनं ममालक्ष्म्या विशुष्येत्सरितांपतिः॥३॥६७।२५ राज्यनाशाला गेलें, वनवास घडला, सीता नष्ट झाली, पक्षी ( जटायु ) मेला, अशा प्रकारची माझी अलक्ष्मी-दुर्दैव-सर्वभक्षक अग्नीलाही जाळून टाकील. ( तसेंच ) जर आज मी समुद्र तरूं लागेन तर माझ्या या अलक्ष्मीच्या योगानें तोही शुष्क होईल. ४१९. रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् । अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम् ॥२।४०९ ( सुमित्रा म्हणते ) बाबा ( लक्ष्मणा ) ! रामाचे ठिकाणी दशरथ राजाची भावना, कर, जनकात्मजा सीता मी आहे, असे समज, आणि अरण्य म्हणजे अयोध्या असे समजून वनाला सुखाने जा. ४२०. रामो भामिनि लोकस्य चातुर्वर्ण्यस्य रक्षिता । मर्यादानां च लोकस्य कर्ता कारयिता च सः॥५।३५।११ हे स्त्रिये ! राम हा चातुर्वर्ण्याचा रक्षणकर्ता असून लोकांना धर्ममर्यादा घालून देणारा व त्यांचे रक्षण करविणाराही आहे. ४२१. लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् । अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ २॥११२।१८ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri