पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ४०९. रकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण । रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥ ३३९।१८ हे रावणा ! रत्ने, रथ, इत्यादि रकारादि नांवें रामाला भिणाऱ्या मला त्रासजनक होत आहेत. ४१०. रक्ष्या हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः ॥ २॥१००१४८ राजाने आपल्या देशांत राहणाऱ्या सर्वांचे धर्मानुसार रक्षण करावें. ४११. राघवस्य प्रियां भार्यामधिगन्तुं त्वमिच्छसि । ___अवसृज्य शिलां कण्ठे समुद्रं ततुमिच्छसि ॥३॥४७॥४१ राघवाच्या प्रियभार्येच्या प्राप्तीची इच्छा करतोस. हे तुझें कृत्य गळ्यांत शिळा बांधून तरून जाण्यासारखे आहे. ४१२. राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः । ___ असद्वृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ।। ७७३।१६ अविधीने पाळलेल्या प्रजांचा राजाच्या दोषांनी नाश होतो. राजा दुर्वर्तन करणारा निघाल्यास प्रजा अकाली मरतात. ४१३.राजमूलाः प्रजाःसा राजा धर्मः सनातनः।।७५९प्र.३।३८ सर्व प्रजा राजमूलक असतात. राजा म्हणजे सनातन धर्म होय. ४१४. राजा कर्ता च गोप्ता च सर्वस्य जगतः पिता । राजा कालो युगं चैव राजा सर्वमिदं जगत् ॥७५९प्र.२।६ __राजा हा कर्ता, गोप्ता, तसाच सर्व जगाचा पिता आहे. राजा काल आणि युग असून हे सर्व जगत् राजाच आहे. ४१५. राजा धर्मश्च कामश्च द्रव्याणां चोत्तमो निधिः। धर्मः शुभं वा पापं वा राजमूलं प्रवर्तते ॥ ३५०।१० _राजा (प्रजांचा ) धर्म आणि काम असून ( सर्व ) वस्तूंचा उत्तम निधि आहे. राजा धर्मरूप आहे. शुभ किंवा अशुभ सर्व काही राजमूलक आहे. ४१६. राजा माता पिता चैव राजा हितकरो नृणाम् ॥२।६७।३४ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri