पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. mm ४०३ ये शोकमनुवर्तन्ते न तेषां विद्यते सुखम् । तेजश्च क्षयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥४।७।१२ जे शोकाला अनुसरून वागतात, त्यांना सुख होत नाही. त्यांच्या तेजाचा क्षय होतो. म्हणून तूं शोक करूं नकोस. ४०४. यो विषादं प्रसहते विक्रमे समुपस्थिते । तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थो न सिध्यति॥४॥६४।१० पराक्रमाचा काल येऊन ठेपला असतां जो दुःखाच्या आधीन होतो, तो ( तेणे करून ) तेजोहीन होतो, आणि त्याची अर्थसिद्धि होत नाही. ४०५. यो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते । ___स कृत्वा महतोऽप्यान्न मित्रार्थेन युज्यते॥४।२९।१५ जो योग्य काल निघून गेला असतां मित्रकार्यांकरितां प्रयत्न करितो, त्याने मोठमोठी कार्ये केली, तरी मित्रत्वाला तो योग्य होत नाही. ४०६. यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः । रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ॥ २॥३७॥३ उत्तम गजाचें दान करून केवळ बंधन रज्जूवर कोणी मन ठेवील, ( तर ते आश्चर्य कारक होय.) उत्तम गजाचा त्याग करणाऱ्यास त्या रज्जुस्नेहाने काय होणार ? ४०७. यो हि भृत्यो नियुक्तः सन्भत्रों कर्मणि दुष्करे । कुर्यात्तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तमम् ॥ ६।११७ दुष्कर कार्य करण्याचे कामी धन्याने नेमलेला नोकर त्या कार्यास अनुकूल असें इतर कांहीं कार्य करून दाखवितो, तेव्हा त्यास पुरुष श्रेष्ठ असे म्हणतात. ४०८. यो हि विक्लवया बुद्धया प्रसरं शत्रवे दिशेत् । स हतो मन्दबुद्धिः स्याद्यथा कापुरुषस्तथा ॥ ७।६८२० जो भयभीत मनाने शत्रूला अवकाश देतो, त्या मंदबुद्धीचा क्षुद्र पुरुषाप्रमाणे नाश होतो. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri