पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ___ ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला मित्र आणि बांधव यांची प्राप्ति होते. ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच जगांत मनुष्य, आणि तोच जगांत पंडित. ३९७. यस्यार्थाः स च विक्रान्तो यस्यार्थाः स च बुद्धिमान् । यस्यार्थाः स महाबाहुर्यस्याः स गुणाधिकः ॥६।८३३३६ ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच पराक्रमी; ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच बुद्धिमान्. ज्याच्याजवळ पैसा आहे, तो महाबाहु आणि तोच अधिक गुणवान्. ३९८. यः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति । _____ यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥५।५५६ सर्प जशी जीर्ण त्वचा सोडतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या क्रोधाला जो क्षमेने घालवितो, तोच खरोखर पुरुष म्हटला आहे. ३९९. यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेवते ।। स स्वपक्षे क्षयं याते पश्चात्तैरेव हन्यते ॥ ६८७१६ जो स्वकीय पक्ष सोडून परपक्षाचा स्वीकार करितो, तो स्वपक्ष नाशाला गेला असता, त्यांच्या ( परपक्षा ) कडून मारला जातो. ४००. या त्वं विरहिता नीता चलचित्तेन रक्षसा । दैवसंपादितो दोषो मानुषेण मया जितः ॥६।११५।५ तुला माझा वियोग घडल्यामुळे चंचलचित्त राक्षसाने तुझें हरण केले, हा दैवकृत दोष मनुष्याच्या पराक्रमाने मी दूर केला आहे. ४०१. यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमश्नुते ॥ ७।१५।२४ ___ ज्या प्रकारचे कर्म मनुष्य करितो, त्याचप्रकारचे फळ त्याला मिळते. ४०२. ये तु सभ्याः सदा ज्ञात्वा तूष्णीं ध्यायन्त आसते । यथाप्राप्तं न ब्रुवते ते सर्वेऽनृतवादिनः॥७.५९ प्र.३॥३४ जे सभासद ( एकादी गोष्ट ) जाणूनही स्वस्थ बसून राहातात, बोलणे प्राप्त झाले असतांही बोलत नाहीत, ते खोटे बोलणारे होत. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri