पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ३९१. यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना । इति जानन्परां प्रीतिं गच्छ राम मया सह ॥२।३०।१८ आपल्या संगती ( नरकवास असला तरी तो ) मला स्वर्गवास वाटेल. तसेच आपल्याविना स्वर्गही मला नरक वाटेल. तरी ही माझी आपल्यावरील प्रीति-भक्ति-जाणून रामा ! मला ( वनाला ) घेऊन चला. ३९२. यस्मात्पश्यन्ति दूरस्थान्सर्वाननराधिपाः । चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः ॥३॥३३।१० राजे दूर घडलेले सर्व अर्थ-गोष्टी हेरांकरवी अवलोकन करितात, म्हणून त्यांस ' दीर्घदृष्टि ' असे म्हणतात. या ३९३. यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते । कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्ययम् ॥२।२४।३ ज्याचे नोकर आणि ज्याचे दास मिष्टान्न भोजन करीत आहेत, असा हा राम वनामध्ये मूळे आणि फळे खाऊन कसा राहणार ? । ३९४. यस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् । किं पुना विना रामं कौसल्या वर्तयिष्यति॥२।७४।२८ जिला हजारों पुत्र आहेत, ती कामधेनु देखील ( एक पुत्र क्लेशी झालेला पाहन ) शोक करिते. ( मग जिला एकच पुत्र आहे ) अशी कौसल्या रामावांचून-रामाला वनांत होणारे क्लेश मनांत आणून, कसे बरें जीवन धारण करील? ३९५. यस्यार्था धर्मकामार्थास्तस्य सर्व प्रदक्षिणम् । १० अधनेनार्थकामेन नार्थः शक्यं विचिन्वता॥६।८३।३८ "ज्याच्याजवळ-अर्थ-पैसा-असतो, त्यास धर्म व कामरूप अर्थ प्राप्त होतात, व त्यास सर्व अनुकूल होते. निर्धन, परंतु अर्थाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने अर्थाचा शोध केला, तरी त्यास तो प्राप्त होणे शक्य नाही. ३९६. यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यास्तस्य बान्धवाः। यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः॥६।८३१३५ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri