पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. बांधवांच्या व मित्रांच्या नाशानें प्राप्त होणारे द्रव्य विषमिश्रित भक्ष्य पदार्थांप्रमाणे मी स्वीकारणार नाही. ३८४. यद्विना भरतं त्वां च शत्रुघ्नं वापि मानद । भवेन्मम सुखं किंचिद्भस्म तत्कुरुतां शिखी ॥२।९७८ शत्रुगर्वनाशका ( लक्ष्मणा )! तूं , भरत किंवा शत्रुघ्न यांवांचून मला जर यत्किंचित् तरी सुख होइल, तर ते अग्नीने जाळून भस्म करावें. ३८५. यद्वत्ताः सन्ति राजानस्तद्वृत्ताः संति हि प्रजाः।२।१०९।९ - राजे ज्या वर्तनाचे असतात, त्याच वर्तनाच्या प्रजा असतात. ३८६. यमक्षयमनुप्राप्ता द्रक्ष्यन्ति न हि मानवाः॥२॥६४।६१ जे लोक यमसदनास जातात, ते ( आपल्या इष्ट जनांस ) पुनः पाहूं शकत नाहीत. ३८७. यमिच्छेत्पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ॥२॥४०५० ( देशांतरी जाणाऱ्याने ) पुनः सत्वर यावे, अशी इच्छा असल्यास फार दूरपर्यंत पोहोचवू नये. ३८८. यमिच्छेन्नरकं नेतुं सपुत्रपशुबान्धवम् । देवेष्वधिष्ठितं कुर्याद्गोषु तं ब्राह्मणेषु च ॥७५९प्र.२।४८ ज्याला पुत्र, पशु, बांधव या सर्वांसह नरकास नेण्याची इच्छा असेल, त्याला देवांवर, ब्राह्मणांवर किंवा गाईवर अधिकारी नेमावा. ३८९. यस्तु राजा स्थितोऽधर्मे मित्राणामुपकारिणाम् । मिथ्या प्रतिज्ञां कुरुते को नृशंसतरस्ततः ॥४।३४८ - जो राजा अधर्माने वागणारा असून, उपकारी मित्रांपाशी खोटी प्रतिज्ञा करितो, त्याहून अत्यंत दुष्ट असा कोण बरें आहे ? ३९०. यस्तु हित्वा मतं भर्तुः स्वमतं संप्रधारयेत् । . अनुक्तवादी दूतः सन्स दूतो वधमर्हति ॥६।२०।१९ जो दूत आपल्या धन्याचे मत सोडून आपलेंच मत प्रतिपादन करितो, तो दूत अनुक्तवादी असल्यामुळे वधास पात्र आहे. CC-O PE Charadhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri