पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. हे कल्याणि ! मनुष्य शुभ अथवा अशुभ जे काही कर्म करितो, त्याच आपल्या कर्मापासून झालेलें ( शुभाशुभ ) कर्म तो पावतो. ३७९. यदा विनाशो भूतानां दृश्यते कालचोदितः । तदा कार्ये प्रमाद्यन्ति नराः कालवशं गताः॥३॥५६।१६ काळाची प्रेरणा होऊन जेव्हां प्राण्याचा विनाश दिसून येतो, तेव्हां कालवश झालेले ते प्राणी कार्यप्रमादी होतात. ३८०. यदि त्वं प्रस्थितो दुर्ग वनमयैव राघव । अग्रतस्ते गमिष्यामि मृद्गन्ती कुशकण्टकान्॥२।२७७ राघवा ! आपण जर आज दुर्गम वनवासाला निघाला, तर तुमच्यापुढे मीही दर्भ व कंटक तुडवीत निघेन. ३८१. यदिन्द्रो वर्षते वर्ष न तचित्रं भविष्यति । आदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नमः॥४॥३९।२ चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्यनिर्मलाम् त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥४॥३९।३ इंद्र जी वृष्टि करितो, सहस्रकिरण सूर्य आकाशाची जी काळोखी नाहीशी करितो, चंद्र आपल्या कांतीने जी सौम्यता व निर्मलता रात्रीस देतो, त्याप्रमाणे हे परंतपा! तुजसारखा कोणी मित्रांचा संतोष (प्रत्युपकाराने) करितो, त्यांतही आश्चर्य नाही. ३८२, यदि ह्यकाले मरणं यदृच्छया लभेत कश्चिद्गुरुदुःखकर्शितः । गताहमचैव परेतसंसदं विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ॥२।२०५३ अत्यंत दुःखपीडित मनुष्य स्वेच्छेनुरूप जर मरण पावेल, तर वत्सरहित धेनूप्रमाणे मीही तुझ्या वियोगाने आजच यमसदनाला गेल्ये असत्यें. ३८३. यद्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् । नाहं तत्प्रति गृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥२।९७।४ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri