पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ३७४. यदन्तरं वायसवैनतेययो र्यदन्तरं मद्गुमयूरयोरपि । यदन्तरं हंसकगृध्रयोर्वने तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३॥४७/४७ कावळा आणि गरुड यांमध्ये जेवढे अंतर आहे, जलकाक आणि मोर यांमध्ये जेवढे अंतर आहे, हंस आणि गृध्र यांमध्ये जेवढे अंतर आहे, तेवढें दाशरथि राम आणि तूं यांमध्ये आहे. ३७५. यदन्तरं सिंहशगालयोर्वने । । यदन्तरं स्यन्दनिकासमुद्रयोः । सुराग्यसौवीरकयोर्यदन्तरं तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३।४७।४५ _जें अंतर सिंह आणि कोल्हा यांमध्ये आहे, जे अंतर लहानसा पाण्याचा झरा आणि समुद्र यांमध्ये आहे, जे अतर अमृत आणि कांजी यांमध्ये आहे, तें अंतर दाशरथि राम आणि तूं यांत आहे. ३७६. यदन्तरं काञ्चनसीसलोहयो र्यदन्तरं चन्दनवारिपङ्कयोः । यदन्तरं हस्तिबिडालयोर्वने तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३।४७४६ जेवढे अंतर सुवर्ण आणि शिसे यांत आहे, जेवढे अंतर चंदन आणि जलपंक यांत आहे, जेवढे अंतर हत्ती आणि मांजर यांत आहे, तेवढे अंतर दाशरथि राम आणि तूं यांत आहे. ३७७. यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः॥२।१०३।३० पुरुष जें अन्न भक्षण करितात, तेंच अन्न त्याच्या देवताही भक्षण करितात. ३७८. यदाचरति कल्याणि शुभं वा यदि वाशुभम् । तदेव लभते भद्रे कर्ता कर्मजमात्मनः ॥ २६३।६ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri