पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. सार्थश्रीरामायणसुभाषितानि. wwwwwwwwwwwwwwar - हे राक्षसा ! जशी तुझी स्त्री ( इतरांपासून ) तुला रक्ष्य आहे, त्याप्रमाणेच अन्यांच्याही स्त्रिया त्यांस रक्ष्य आहेत; म्हणून आपलाच दृष्टांत घेऊन स्वस्त्रीच्या ठिकाणी रममाण हो. ३६८. यथा दृष्टिः शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते । तथा नरेन्द्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः ॥ २॥६७३३ जशी दृष्टि शरीराच्या ( हिता)करितां सर्वकाळ प्रवृत्त असते, त्याप्रमाणे राजा हा प्रजेचा राष्ट्रसंबंधी सत्य आणि धर्म यांचा प्रवर्तक होय. ३६९. यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयविन्दवः । न श्लेषमभिगच्छन्ति तथाऽनार्येषु सौहृदम्॥६।१६।११ ज्याप्रमाणे पद्मपत्राचे ठिकाणी पडलेले जलबिंदु त्या पत्राशी संलग्न होत नाहीत, त्याप्रमाणे अनार्य जनांचे ठिकाणी मित्रत्व होय. ३७०. यथा पूर्व गजः स्नात्वा गृह्य हस्तेन वै रजः । दूषयत्यात्मनो देहं तथाऽनार्येषु सौहृदम् ॥ ६।१६।१५ ज्याप्रमाणे हत्ती प्रथमतः स्नान करितो, आणि नंतर लगेच सोंडेनें धूळ घेऊन आपलें ( सर्व ) शरीर दूषित करितो, त्याप्रमाणे अनार्य जनांचे ठिकाणी मित्रत्व होय. ३७१. यथा फलानां. पक्कानां नान्यत्र पतनाद्भयम् । एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ॥२।१०५।१७ - ज्याप्रमाणे पक्कफलाला पतनभय निश्चित आहे, त्याप्रमाणे जन्मास आलेल्या (प्रत्येक ) मनुष्याला मरणभय निश्चयात्मक आहे. ३७२. यथा हि कुरुते राजा प्रजास्तमनुवर्तते ॥ ७॥४३॥१९ - राजा जें वर्तन करितो, त्याचे अनुकरण प्रजा करितात. ३७३. यथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् । अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥२।६७।२९ जशा उदकहीन नद्या, जसें तृणरहित वन, जशा गुराख्यावांचून गाई, त्याप्रमाणे अराजक राष्ट्र होय. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri