पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. म्हणून जो आपलें प्रत्यक्ष दैवत, त्या मनुष्याचे चित्त कसें लीन होणार नाही ? होणार नाही ? ३६२. यत्कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता। तत्कृतं रावणं हत्वा मयेदं मानकाशिणा॥६।११५।१३. मी मानकांक्षी असल्यामुळे शत्रूने केलेल्या स्त्रीहरणरूप पातकाच्या निरसनार्थ मनुष्याने जे काही करावयाचे, तें रावणाचा वध करून मी केले आहे. ३६३. यत्कृत्वा न भवेद्धर्मो न कीर्तिनं यशो ध्रुवम् । शरीरस्य भवेत्खेदः कस्तत्कर्म समाचरेत् ॥ ३५०।१९ _ में केल्याने धर्म, कीर्ति, अढळ यश, यांपैकी काहीएक प्राप्त होत नाही. उलट शरीराला खेद मात्र होतो, त्या कर्माचे आचरण कोण करणार? ३६४. यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः।।२।४८।१५ जेथें रामाची वसति आहे, तेथें भय व पराजय ही राहू शकत नाहीत. ३६५. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य तु व्यपेयातां कालमासाद्य कं चन॥२।१०५।२६ एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च । समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः।।२।१०५।२७. ज्याप्रमाणे महासमुद्रांत दोन नौका एकत्र येतात, व कांहीं काल तशा राहून नंतर वियुक्त होतात, त्याप्रमाणे स्त्रिया, पुत्र, ज्ञाति, द्रव्ये ही ( कांहीं काल ) एकत्र राहून नंतर नाश पावतात. कारण, ह्या सर्वांचा वियोग निश्चित आहे. ३६६. यथागारं दृढस्थूणं जीर्णं भूत्वोपसीदति । तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशं गताः॥२।१०५।१८ घराचे खांब बळकट असले, तरी ( तें गृह ) जीर्ण होऊन नाश पावतें. त्याप्रमाणे मनुष्य जरा व मृत्यु यांच्या स्वाधीन होऊन नाश पावतात. ३६७. यथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर । आत्मानमुपमां कृत्वा खेषु दारेषु रम्यताम् ॥५।२१।७ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri