पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. पिता, भ्राता किंवा पुत्र यांनी कितीही दिले, तरी तें परिमितच असावयाचें. अपरिमित देणारा म्हणजे एक पतिच होय. अशा पतीची सेवा कोणती स्त्री करणार नाही ? ३५५. मुमूर्पूणां तु सर्वेषां यत्पथ्यं तन्न रोचते ॥३॥५३॥१८ जे मरणोन्मुख झालेले असतात, त्यांना पथ्य म्हणून आवडतच नाही. ३५६. मूलमर्थस्य संरक्ष्यमेष कार्यविदां नयः। मूले हि सति सिध्यन्ति गुणाः सर्वे फलोदयाः॥४।६५।२५ अर्थाचें-वस्तूचें-मूल रक्षण करावें, ही कार्यज्ञ पुरुषांची नीति आहे. ते मूल राहिल्यास सर्व उदयोन्मुख गुण सिद्धीप्रत जातात. ३५७. मृदुर्हि परिभूयते ॥ २।२१।११ जो मृदु असतो, त्याचा ( सर्वत्र ) पराजय व्हावयाचाच. ३५८. यः कृते हन्यते भर्तुः स पुमान् स्वर्गमृच्छति॥६।९२।९ जो स्वामिकार्टी मारिला जातो, तो पुरुष स्वर्गाला जातो. ३५९. यः खल्वपि वनं प्राप्य मृगव्यालनिषेवितम् । न पिबेन्मधु संप्राप्य स नरो बालिशो भवेत् ॥६।१३।२ जो पुरुष मृगसांनीं सेवित अशा वनांत जाऊन तेथें मधु प्राप्त झाले तरी त्याचे प्राशन करीत नाही, तो मूर्ख होय. ३६०. यः पश्चात्पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति । पूर्व चापरकार्याणि स न वेद नयानयौ ॥६।१२।३२ जो प्रथमकर्तव्य अशी कामें मागाहून करण्याची इच्छा करितो, आणि नंतरची कामे पूर्वी करू पाहतो, त्याला नयानय समजत नाही. ३६१. यतो मूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः । कथं तस्मिन्न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥ २।१८।१६ जो आपल्या जन्मास मूळ कारण, ज्यापासून आपण जन्माला आलों, व CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri