पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ५९ वैराचा अंत मरणाबरोबर होत असल्यामुळे, ते आमचें वैराचे प्रयोजन आतां संपले. तर जसा तो तुझा आप्त, तसाच माझाही असल्यामुळे, त्याचा संस्कार कर. ३५१. महतेवाम्बुवेगेन भिन्नः सेतुर्जलागमे । दुरावरं त्वदन्येन राज्यखण्डमिदं महत् ॥ २॥१०५।५. पर्जन्यकाली जलवेगाने मोडलेला पूल दुरुस्त करणे अत्यंत कठीण होते, त्याप्रमाणे हे मोठे राज्यखंड-अयोध्या-तुझ्यावांचून इतरांस आवरणें कठीण आहे. ३५२. महर्षयो धर्मतपोभिरामाः कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥४॥३३॥५७ धर्मार्थ तपश्चर्या करून त्यांत रममाण होणारे असे महर्षिही कामातुर होऊन स्त्रियांविषयी मोहित झाले आहेत, मग नैसर्गिकच चपळवृत्तीचा असा हा ( वानरांचा ) राजा सुखाच्या ठिकाणी कसा बरें आसक्त होणार नाही ? 20 ३५३. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः। यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ १।२।१५ हे' निषादा ! या क्रौंच जोडप्यांतील काममोहित झालेल्या पुरुषास ज्या अर्थी तूं वधिलेंस, त्या अर्थी तूं फार दिवस वाचणार नाहीस. ३५४. मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः । अमितस्य तु दातारं भतारं का न पूजयेत् ॥१२॥३९।३० १. या श्लोकाचा अन्य रीतीने आशीर्वादपर खालीलप्रमाणे अर्थ करितां येतो. हे मा-निषाद-लक्ष्मीचे निवासस्थानभूत रामचंद्रा ! मंदोदरी व रावण या दंपत्यांतून रावणाचा तुम्ही वध केला, त्याअर्थी अनेक वर्षेपर्यंत अखंड प्रतिष्ठेस-. ऐश्वर्यास-आपण प्राप्त व्हावें. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri