पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ सार्थश्रीरामायणसुभाषितानि, ३४५. मनो हि हेतुः सर्वेषामिन्द्रियाणां प्रवर्तने । ॐ शुभाशुभास्ववस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम् ॥५।११।४३ - जे मन चांगल्यावाईट कर्माला प्रवृत्त करितें, तें मन माझ्या स्वाधीन आहे. ३४६. मन्त्रमूलं च विजयं प्रवदन्ति मनस्विनः ६।६।५ _ विजय म्हणजे मंत्रमूलक होय, असें मनस्वी-शहाणे-लोक म्हणतात. ३४७. मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका । यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेदश ॥ २।५३।२२ हे लक्ष्मणा ! मजपेक्षां ( कौसल्येला ) ती साळुकी अधिक आवडती असली पाहिजे. कारण, तिजपासून ' हे शुका ! शत्रूचे-मार्जारा-चे पायांस दंश कर, असे शब्द ऐकण्यात येतातं. ३४८. ममैव नूनं मरणं न विद्यते न चावकाशोऽस्ति यमक्षये मम । यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति प्रसह्य सिंहो रुदतीं मृगीमिव ॥ २।२०५० मी आतां खरोखर मरणार नाही. यमाच्या गृही राहाण्याला मला जागा नाही. सिंह जसा रोदन करणाऱ्या हरिणीवर बलात्कार करून तिला नेण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याप्रमाणे यम मला नेऊ इच्छीत नाही. ३४९. मयैकेन तु नियुक्तः परिमुच्यस्व राघव । मां हि भूतबलिं दत्त्वा पलायस्व यथासुखम् ॥३॥६९।३९ अधिगन्तासि वैदेहीमचिरेणेति मे मतिः॥३॥६९।४०. (लक्ष्मण म्हणाला,) 'हे राघवा ! माझ्या एकट्याचा या राक्षसाला कबंधालाबलि देऊन आपणाला सोडीव, आणि येथून सुखाने पळून जा. लवकरच जानकीची तुला प्राप्ति होईल, असे मला वाटते.' ३५०. मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् । क्रियतामस्य संस्कारो ममाप्येव यथा तव ॥६।१०९।२६ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri