पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ५७ ३४०. भवान्कलनमस्माकं स्वामिभावे व्यवस्थितः। स्वामी कलत्रं सैन्यस्य गतिरेषा परंतप ॥ ४६५।२३ हे शत्रुनाशना ! स्वामिपदाचे ठिकाणी असणारा तूं आमचे कलत्र रक्षकआहेस. सैन्याचे कलत्र रक्षण करणरा प्रभु होय. ३४१. भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण । त्वया पुत्रेण धर्मात्मा न संवृत्तः पिता मम ॥३।१५।२९ हे लक्ष्मणा ! तूं माझ्या मनांतील अभिप्राय जाणणारा आहेस. तूं कृतज्ञ आहेस, धर्मज्ञ आहेस; अशा तुझ्या पुत्राच्या योगें माझा धर्मात्मा पिता (दशरथ) मरण पावला नाही-जीवंत आहे. ३४२. भूताश्चार्थी विनश्यन्ति देशकालविरोधिताः। विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ॥५।२।३७ __सूर्योदयीं तमाचा नाश होतो, त्याप्रमाणे अविचारी दूत मिळाल्याने सिद्धकायही देशकालविरुद्ध होऊन नाश पावतात. ३४३. मत्ता गजेन्द्रा मुदिता गवेन्द्रा वनेषु विक्रान्ततरा मृगेन्द्राः । रम्या धरेन्द्रा निभृता नरेन्द्राः प्रक्रीडितो वारिधरैः सुरेन्द्रः॥४।२८।४३ गजेंद्र मत्त झाले आहेत, वृषभ आनंदित झाले आहेत, सिंह वनामध्ये पराक्रमाने संचार करीत आहेत, पर्वत रमणीय दिसत आहेत, राजे सुखी झाले आहेत, आणि देवांचा राजा इंद्र याने मेघांबरोबर क्रीडा करून वृष्टि करून समृद्धि केली आहे. ३४४. मदङ्गे जीर्णतां यातु यत्त्वयोपकृतं कपे । नरःप्रत्युपकाराणामापत्स्वायाति पात्रताम् ॥७॥४०।२४ हे कपे ! तूं केलेले उपकार माझ्या अंगी जिरून जावोत. मनुष्य संकटकाली उपकारांच्या फेडीला पात्र होत असतो. ( तुझे उपकाराचे ओझें मजवर जशाचे तसें राहणार.) CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri