पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८३ श्रीवमीपर-विद्यामन्दिर, देचत्रबाग सार्थश्रीरामायणसुभाषितानि. धर्मानुष्ठान करूनही इतरांच्या अपराधाने परिवारासह नाश पावलेले अनेक साधुपुरुष या लोकी आहेत. ३२८. बालिशस्तु नरो नित्यं वैक्लव्यं योऽनुवर्तते । समजत्यवशः शोके भाराक्रान्तेव नौजले॥४७।१० ____जो मूर्ख असतो, तो सदोदित क्लेश होईल, असें वर्तन करितो, व असहाय होऊन जलांतील भाराक्रांत नौकेप्रमाणे शोकसागरांत बुडून जातो. ३२९. बालिशो बत कामात्मा रामो दशरथात्मजः । इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि॥६।११८।१४ मी जानकीची शुद्धि न करितां ( तिचे ग्रहण केल्यास ) राम हा अत्यंत कामासक्त झाला आहे आणि मूर्ख आहे, असे लोक मला म्हणतील. ३३०. बालेन्द्रगोपान्तरचित्रितेनलक्ष्मीधर-विद्यामन्दिर SE विभाति भूमिनेवशाद्वलेन । हाल हिमालय गात्रानुपृक्तेन शुकप्रमेण वस्थापक- पं. चोपयो नारीव लाक्षोक्षितकम्बलेन ॥ ४।२८।२४ सांप्रत भूमि नवतृणयुक्त झाली असून त्या तृणाला ( त्यावर ) बसलेल्या इंद्रगोप कीटकांनी चित्रविचित्र शोभा प्राप्त झाली आहे. त्यामुळे ती भूमि पोपटी रंगाचे लाक्षाबिंदुयुक्त कंबल पांघरून स्थित असलेली नारीच की काय, असे वाटत आहे. ३३१. बाष्पेण पिहितं दीनं रामः सौमित्रिणा सह । चकर्षेव गुणैर्बद्धं जनं पुरनिवासिनम् ॥ २।४५।१२ रामलक्ष्मणांनी त्या दीन झालेल्या व शोकाजूंनी नेत्र झांकून राहिलेल्या पौरजनांस आपल्या गुणरूप रज्जूंनी आकर्षणच केले आहे की काय, असे वाटले. ३३२. ब्रह्मन्ब्रह्मबलं दिव्यं क्षात्राच्च बलवत्तरम् ॥११५४।१४ हे ब्राह्मण ! क्षात्रबलापेक्षां दिव्य ब्रह्मबल अधिक बलवान् आहे. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri