पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. and ~ aaraaaaaaaaaaaa ३२२. प्रियं चैद्भरतस्यैतद्रामप्रव्राजनं भवेत् । मा स्म मे भरतः कार्षीत्प्रेतकृत्यं गतायुषः॥२।१२।९२ रामाचा वनवास जर भरताला प्रिय असेल, तर त्याने मी मृत झाल्यावर माझें प्रेतकार्य करूं नये. ३२३. प्रैष्यं पापीयसां यातु सूर्य च प्रति मेहतु । का हन्तु पादेन गां सुप्तां यस्यार्योऽनुमते गतः ॥२।७५।२२ ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनवासाला गेला, त्याला अत्यंत पापी जनांची सेवा करणे भाग पडो. त्यास सूर्याचे पुढे मूत्र केल्याचे पाप लागो; तसेंच निद्रिस्त गोवधाही पाप त्याच्या अंगी जडो. ३२४. प्रोत्साहितोऽयं कैकेय्या संतुष्टो यदि नः पिता। 8. अमित्रभूतो निःसङ्गं बध्यतां वध्यतामपि ॥२।२१।१२ । कैकेयीच्या प्रोत्साहनाने तिजवर संतुष्ट होऊन आमचा पिता जर आमच्यांशी शत्रुत्वाने वागू लागेल, तर खरोखर आम्ही त्याचे बंधन करावें, अगर त्याचा वधही करावा. ३२५. बलिषड्भागमुध्दृत्य नृपस्यारक्षितुः प्रजाः। अधर्मो योऽस्य सोऽस्यास्तु यस्यार्योऽनुमते गतः॥२।७५/२५ प्रजांपासून ( कररूपाने ) सहावा भाग घेऊनही त्यांचे रक्षण न केल्याने जें पाप राजास लागते, तें पाप ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनाला गेला, त्याला लागो. ३२६. बलैः समग्रैयुधि मां रावणं जित्य संयुगे । विजयी स्वपुरं यायात्तत्तस्य सदृशं भवेत् ॥५।३९।२९ समग्र सैन्यासह येऊन व रणांगणावर रावणाला जिंकून विजयी होत्साता राम मला राजधानीला घेऊन जाईल, तर ती गोष्ट त्याला उचित होईल. ३२७. बहवः साधवो लोके युक्ता धर्ममनुष्ठिताः। परेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥ ३॥३९।२१ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri