पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ३१६. प्रधानं साधकं वैद्यं धर्मशीलं च राक्षस । ज्ञातयोऽप्यवमन्यन्ते शूरं परिभवन्ति च ॥६।१६।४ हे राक्षसा ! ज्ञातिजन श्रेष्ठ, साधक, विद्वान् आणि धर्मशील अशांचा अवमान करितात, आणि ( संधि पाहून ) शूरांचा पराभव करितात. ३१७. प्रवादः सत्यमेवायं त्वां प्रति प्रायशो नृप । पतिव्रतानां नाकस्मात्पतन्त्यश्रूणि भूतले ॥६।११११६६ हे राजा ! पतिव्रता स्त्रियांचे अश्रु कारणावांचून भूतलावर कधीही गळून पडत नाहीत, म्हणून जो प्रवाद आहे, तो तुजसंबंधी विचार केला असतां, प्रायशः खरा ठरतो. ३१८. प्रशमश्च क्षमा चैव आर्जवं प्रियवादिता । का असामर्थ्यफला ह्येते निर्गुणेषु सतां गुणाः॥६।२१।१४ शांति, क्षमा, सरलपणा, प्रियवादित्व हे सज्जनांचे गुण निर्गुण पुरुषांच्या ठिकाणी निरुपयोगी होतात. ३१९. प्राप्तचारित्रसंदेहा मम प्रतिमुखे स्थिता । दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ॥६।११५।१७ तुझ्या आचरणाविषयी संशय उत्पन्न झाला आहे. नेत्ररोग्याला दीप, त्याप्रमाणे मजसमोर उभी असलेली तूं मला अत्यंत प्रतिकूल झाली आहेस. ३२०. प्राप्स्यामि यानद्य गुणान्को मे श्वस्तान्प्रदास्यति । अपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे ॥२॥३४।४० जे जे चांगले पदार्थ आज मला येथे मिळत आहेत, ते ते उद्यां कोण देणार ? म्हणूनच वनगमनाची मी अंतःकरणपूर्वक इच्छा करीत आहे. ३२१. प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते ॥२।२७।९ (पतीवांचून ) गच्चीवर बसणे, आकाशमार्ग विमानांतून गमन करणे, ( इत्यादि अनेक सुखें प्राप्त झाली तरी ) त्यांपेक्षां ( पतिधर्महीन ) भर्त्याचे सर्व प्रकारे पादसेवन करणे, हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म होय. म CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri