पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ३०८. पूर्वापकारिणं हत्वा न ह्यधर्मेण युज्यते ॥२।९६।२४ ज्याने प्रथम अपकार केला आहे, अशाचा वध केला असतां अधर्म घडत नाही. ३०९. पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।। संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ॥ ७५३॥६ जो राजा पोरैजनांची कार्ये प्रतिदिनी करीत नाही, तो वायुरहित घोर नरकांत पडतो, यांत संशय नाही. ३१०. पौरा ह्यात्मकृतादःखाद्विप्रमोच्या नृपात्मजैः। न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः॥२।४६।२३ राजपुत्रांनी आपल्याकरितां दुःखी झालेल्या पौरांस ( दुःख )मुक्त करावें, त्या पौरजनांना आपल्यामुळे आपल्या निमित्तानें-दुःखांत घालू नये. ३११. पौरुषेण तु यो युक्तः स तु शूर इति स्मृतः॥६।७१।६० - ज्याच्या अंगी पराक्रम आहे, तोच शूर होय, असे सांगितले आहे. ३१२. प्रतिग्रहो हि विप्रेन्द्र क्षत्रियाणां सुगर्हितः॥ ७७६।३५ हे ब्राह्मणश्रेष्ठा ! क्षत्रियांस प्रतिग्रह म्हणजे अत्यंत निंद्य होय. ३१३. प्रतिज्ञायां हि नष्टायां धर्मो हि विलयं ब्रजेत् ॥७।१०६।९ प्रतिज्ञा नष्ट झाली असतां धर्म लयाला जातो. ३१४. प्रतिवक्तुं प्रकृष्टे हि नापकृष्टस्तु शक्नुयात् ॥४।१८।४७ (तुजसारख्या ज्ञानसंपन्न ) श्रेष्ठाला निकृष्ट-अडाणी-पुरुष प्रत्युत्तर देण्यास समर्थ होणार नाही. ३१५. प्रत्यगारमिवायान्ती सवत्सा वत्सकारणात् । बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत ॥ २।४०।४३ सवत्स धेनु (बद्ध करून ठेवलेल्या) वासराकरितां जशी घरोघर धांवत सुटते, त्याप्रमाणे राममाता ( कौसल्या ) रामामागे धावू लागली. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri