पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ज्या पापकर्माचे फल प्रत्यक्ष दिसून येत आहे, तें कर्म करण्यास कोण बरें अवृत्त होईल ? असें कर्म लोकाधिपति इंद्रही करणार नाही, अथवा भगवान् ब्रह्मदेवही करणार नाही. ३०१. पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ॥२॥३४।५२ _बाबा ! पिता म्हणजे देवतांचेही दैवत असें ( शास्त्रकारांनी ) सांगितले आहे. ३०२. पितुर्हि वचनं कुर्वन कश्चिन्नाम हीयते ॥ २॥२१॥३७ पितृवाक्याचे पालन करणारा कोणीही हानि पावत नाही... ३०३. पितुर्हि समविक्रान्तं पुत्रो यः साधुमन्यते । तदपत्यं मतं लोके विपरीतमतोऽन्यथा ॥ २।१०६।१५ पित्याने मर्यादातिक्रम केला असतांही त्याजबद्दल जो मान्यता दर्शवितो, त्यासच लोकांत 'अपत्य' असें मानितात. ह्याच्या उलट वागणाऱ्यास अपत्य म्हणत नाहीत. ३०४. पीडाकरममित्राणां यच्च कर्तव्यमेव तत्।। ६।८१।२९ शत्रूना जें जें म्हणून पीडादायक आहे, तें तें ( त्यांत पाप असले तरी ) कर्तव्यच होय. ३०५. पुन्नानो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः । _____ तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः॥२।१०७।१२ ' ' पुत् 'नामक नरकापासून पित्याचे रक्षण करितो, अथवा ( स्वर्गलोकप्राप्तिकारक कर्मानी ) जो पितरांचे नित्यशः रक्षण करितो, त्यासच ‘पुत्र' असें म्हणतात. ३०६. पुरुषस्य हि लोकेस्मिञ्शोकः शौर्यापकर्षणः ॥६।२।१३ शोक हा पुरुषाच्या शौर्याचा नाश करणारा आहे. ३०७. पूर्व कृतार्थो मित्राणां न तत्प्रतिकरोति यः। कृतघ्नः सर्वभूतानां स वध्यः प्लवगेश्वर ॥४॥३४।१० हे वानरश्रेष्ठा ! पूर्वी मित्रांकडून कृतकार्य होऊन जो त्या मित्रांचे उपकार 'फेडीत नाही, असा कृतघ्न पुरुष सर्व लोकांस वध्य आहे. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri