पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. monu २९५. परस्वहरणे युक्तं परदाराभिमर्शकम् । त्याज्यमाहुर्दुरात्मानं वेश्म प्रज्वलितं यथा॥६।८७।२३ - परद्रव्यापहारी आणि परस्त्रीहरणकर्ता असा जो दुरात्मा तो प्रज्वलित गृहाप्रमाणे त्याज्य होय. . २९६. परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् । सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषाःक्षयावहाः॥६।८७।२४ परस्वाचे हरण, परस्त्रीसमागम आणि मित्रांच्या ठिकाणी शंकित वृत्ति हे तीन दोष नाशकारक आहेत. २९७. पराक्रमोत्साहमतिप्रताप सौशील्यमाधुर्यनयानयैश्च । गाम्भीर्यचातुर्यसुवीर्यधैर्यै हनूमतः कोऽप्यधिकोऽस्ति लोके ॥ ७।३६।४३ पराक्रम, उत्साहवुद्धि, अति प्रताप, सुशील, वाङ्माधुर्य, नयानयाचे ज्ञान, गांभीर्य, चातुर्य, उत्तम वीर्य आणि धैर्य, या गुणांत हनुमंताहून अधिक या लोकी दुसरा कोण बरें आहे ? २९८. परान्तकाले हि गतायुषो नरा हितं न गृह्णन्ति सुहृद्भिरीरितम् ॥ ६।१६।२७ कालग्रस्त लोक आयुष्याचा क्षयकाल जवळ आला असतांही सुहृदांनी सांगितलेल्या वचनाचा स्वीकार करीत नाहीत. २९९. परिमृष्टो दशान्तेन दशाभागेन सेव्यते ॥ ३।७२।८ ज्या मनुष्यावर मृत्यूच्या कालाची छाया पडली आहे, तो दुर्दशावस्थेला प्राप्त होतो. ३००. पापानुबन्धो वै यस्य कर्मणः को नु तत्पुमान् । कुर्वीत लोकाधिपतिः स्वयंभूर्भगवानपि ॥३॥५१॥३२ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri