पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थश्रीरामायणसुभाषितानि. ४९ | २८८. परत्रवासे हि वदन्त्यनुत्तमं तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् ॥२।११।२९ परलोकी मनुष्यांना कल्याणकारक होईल, असें हितप्रद आणि सत्य भाषण | तपोधन करितात. २८९. परदाराभिमर्शात्तु नान्यत्पापतरं महत् ॥ ३॥३८॥३० __परस्त्रीसंगाहून महत्तर असें दुसरे कोणतेच पाप नाही. २९०. परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणम् । इदं खलु ममात्यर्थं धर्मलोपं करिष्यति ॥५।११।३९ __ अंतःपरांत निजलेल्या परस्त्रियांचे अवलोकन, ही गोष्ट माझ्या धर्माचा | अतिशयेंकरून लोप करील. २९१. परं निर्वदमागम्य न हि नोन्मीलनं क्षमम् ॥४॥४९।८ परम दुःखाचा आश्रय करून अनुद्योगी होणे अयोग्य होय. २९२. परमापद्गतस्यापि धर्मे मम मतिभवेत् ॥ ७।१०।३० - मी परम आपत्तीत प्राप्त झालों असतांही, माझी बुद्धि धर्माच्या ठिकाणी वसावी. २९३. परस्पर्शात्तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे। पितुर्विनाशात्सौमित्रे स्वराज्यहरणात्तथा ॥३।२।२१ लक्ष्मणा ! सीतेला झालेला परस्पर्श ह्याहून अधिक दुःखदायक असें मला कांही वाटत नाही. पित्याचे मरण व स्वराज्यहरण ह्यांहूनही तें दुःख अधिक आहे. २९४. परस्य वीर्य स्वबलं च बुद्धा स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् । तथा स्वपक्षेऽप्यनुमृश्य बुद्धया वदेत्क्षमं स्वामिहितं समन्त्री ॥ ६।१४।२२ जो पुरुष शत्रूचे आणि आपलें बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि, आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करितो, आणि स्वामीचे हित कशांत आहे ते सांगतो, तोच मंत्री होय. ४ . स CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri