पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. mu बलवान् व्याघ्र ज्याप्रमाणे पुच्छस्पर्श सहन करीत नाही, त्याप्रमाणे राघव अशा प्रकारचा असत्कार कधीही सहन करणार नाही. २८३. नैषा हि सा स्त्री भवति श्लाघनीयेन धीमता । उभयोर्लोकयोर्लोके पत्या या संप्रसाद्यते ॥२।६२।१३ उभय लोकीं-स्वर्गलोकी व मनुष्यलोकीं-स्तुत्य व धीमान् पतीकडून, आपण प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करून घेते, ती लोकांत कुलस्त्री गणली जात नाही, २८४. न्यस्तदण्डा वयं राजञ्जितक्रोधा जितेन्द्रियाः। रक्षणीयास्त्वया शश्वद्गर्भभूतास्तपोधनाः॥३।१।२२ हे राजा ! आम्हीं तपोधन असून (प्राणिमात्राचे ठायीं ) शासनाचा त्याग केल आहे; आम्हीं क्रोध जिंकिला आहे; आम्ही जितेंद्रिय आहों; तरी उदरी प्रार झालेल्या गर्भाचे आई सर्वदा रक्षण करिते, तसें त्वां आमचे रक्षण करावें. २८५. पतिहि देवता नार्याः पतिबन्धुः पतिर्गुरुः । प्राणैरपि प्रियं तस्माद्भर्तुः कार्य विशेषतः॥७/४८।१८ पति ही स्त्रियांची देवता आहे. स्त्रियांचा बंधु आणि गुरुही तोच आहे. म्हणून भांचे प्रियकार्य प्राण खर्ची घालूनही विशेषेकरून त्यांनी करावें. २८६. पतिशुश्रूषणानार्यास्तपो नान्यद्विधीयते ॥ २।११८९ पतिशुश्रूषेपलीकडे स्त्रीला दुसरे कोणतेही तप नाही. २८७. पद्ममातपसंतप्तं परिक्लिष्टमिवोत्पलम् । काञ्चनं रजसा ध्वस्तं क्लिष्टं चन्द्रमिवाम्बुदैः ॥२॥१०४।२५ मुखं ते प्रेक्ष्य मां शोको दहत्यग्निरिवाश्रयम् । भृशं मनसि वैदेहि व्यसनारणिसंभवः ॥२।१०४।२६ - उन्हाने संतप्त झालेले पद्म, चुरडलेलें रक्तकमल, धुळीने मलिन झाले सुवर्ण, अथवा मेघाच्छादित चंद्र, यांप्रमाणे तुझें मुख पाहून (अरणीपासून उत्पा झालेला) अग्नि आश्रयभूत काष्ठांस दहन करितो, तसाच माझ्या अंतःकरणां दुःखरूप अरणीपासून उत्पन्न झालेला शोक मला दहन करीत आहे. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri