पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. mmmmmmmmmmmmmmmm mmmmmmmm २७७. नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षणकारणात् । पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ॥१।२५।१८ ज्यास प्रजारक्षण करावयाचे आहे, त्याला त्या रक्षणाकरितां क्वचित् प्रसंगी थोडेसें क्रौर्याचे किंवा किंचित् पातक, अगर कांहीं सदोष, कर्म करणे भाग पडले, तरी त्याने तें करावें.. २७८. नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा ।। नहीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ २।९७७ . हे सौम्य लक्ष्मणा ! ही समुद्रवसना पृथ्वी मला दुर्लभ आहे, असें नाहीं. तथापि मी तिची इच्छा करीत नाही. अधर्माने इंद्रपद मिळाले, तरी त्याची मी इच्छा करीत नाही. २७९. नैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन । परैर्वा हन्यते वीरः परान्वा हन्ति संयुगे ॥६।१०९।१८ - युद्धांत निश्चयात्मक जयच होतो, असें पूर्वी कधीही झाले नाही. वीर रणांगणावर शत्रूकडून मारला जातो, किंवा शत्रूला मारितो. २८०. नैतचित्रं नरव्याघ्र शीलवृत्तविदां वरे । यदायें त्वयि तिष्ठेत्तु निनोत्सृष्टमिवोदकम्॥२।११३।१६ ( भरता ! ) तूं नरश्रेष्ठ आणि उत्तम प्रकारचा शीलवृत्तज्ञ आहेस. तसेंच, तुझ्या ठिकाणी उत्तम चारित्र्य वसत आहे, त्यांत आश्चर्य नाही. शिंपडलेलें पाणी खोलगट जाग्यांतच रहात असते. २८१. नैतच्छिथिलया बुद्धया त्वं वेत्सि महदन्तरम् । क च स्वजनसंवासः क्व च नीचपराश्रयः॥६।८७।१४ तुझी कार्याकार्यबुद्धि शिथिल झाल्यामुळे ह्या दोहोंतील महदंतर तुला कळत नाही. स्वजनसहवास कोठे, आणि नीचांचा आश्रय कोठे ? २८२. नैवंविधमसत्कारं राघवो मर्षयिष्यति । बलवानिव शार्दूलो वालधेरभिमर्शनम् ॥ २॥६१।१९ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri