पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ( सीतेचे ) सदोदित पादवंदन घडत असल्यामुळे तिची पायांतील नूपुरे मात्र माझ्या परिचयाची आहेत. तिची बाहुभूषणे किंवा कर्णभूषणें मी ओळखू शकत नाही. २७१. नित्यमन्योन्यसंहृष्टा व्यसनेष्वाततायिनः।। प्रच्छन्नहृदया घोरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ६।१६।५ ज्ञातिजन म्हटले म्हणजे परस्परांच्या संकटप्रसंगी हर्षित होणारे, सर्वदा गुप्तपणे आततायीपणाची कृत्ये करणारे, असे घोर आणि भयावह असतात. २७२. निमित्तं लक्षणं स्वमं शकुनिस्वरदर्शनम् । अवश्यं सुखदुःखेषु नराणां परिदृश्यते ॥३॥५२॥२ मनुष्यांच्या सुखदुःखांची सूचक अशी निमित्तें, लक्षणे, स्वप्ने, पक्ष्यांचे गमन आणि शब्दस्वर, हे सर्व पुढे होणार, त्याप्रमाणे दिसून येते. २७३.नियुक्तैर्मन्त्रिभिर्वाच्यो ह्यवश्यं पार्थिवो हितम्।४।३२।१८ नियोजित मंत्र्यांनी राजाला हिताच्या गोष्टी अवश्य सांगाव्या. २७४. निरायुधानां क्रमतामसङ्गगतिपौरुषाः । दारा घुपहसिष्यन्ति स वै घातःसुजीवताम्॥६।६६।२० हे दुष्प्रधर्षगति पराक्रमी वानरांनो ! आयुधांवांचून पळणाऱ्या तुम्हांस स्त्रिया हंसतील. तो त्यांचा उपहास मरणापेक्षाही अधिक दुःखदायक आहे. २७५. निरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः। सर्वार्था व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥६।२।६ निरुत्साह, दीन, शोकाने व्याकुल, अशा पुरुषांची सर्व कार्ये नाश पावतात, आणि त्यांजवर संकट कोसळतात. २७६. नीत्या सुनीतया राजा धर्म रक्षति रक्षिता । यदा न पालयेद्राजा क्षिप्रं नश्यन्ति वै प्रजाः॥७५९ प्र. २५ प्रजासंरक्षक राजा उत्तम नीतिमार्ग धर्माचे संरक्षण करितो. राजा ( प्रजा )पालन नीट करणार नाही, तर प्रजा सत्वर नाश पावतील. CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri