पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २६४. नाददानं शरान्घोरान्विमुञ्चन्तं महाबलम् । न कार्मुकं विकर्षन्तं रामं पश्यामि संयुगे ॥ ३॥३४१७, हा महाबलवान् राम ( भात्यांतून ) घोर बाण केव्हां काढितो, केव्हां शत्रूवर सोडितो, तसेंच रणांगणावर धनुष्य केव्हां आकर्षण करितो, हे मला कांहींच कळत नाही. २६५. नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः । सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यो हेमभूषिताः।२।६७।१७ अराजक देशांत सुवर्णभूषणांनी अलंकृत कुमारी सायंकाळी एकत्र जमून बागांत जात नाहीत. २६६. नाराजके जनपदे धनवन्तः सुरक्षिताः । शेरते विवृतद्वाराः कृषिगोरक्षजीविनः॥२।६७।१८ राजहीन देशांत धनवान् लोक सुरक्षित नसतात. कृषि करणारे, गोरक्षण करणारे, लोकही दरवाजे उघडे टाकून निजू शकत नाहीत. २६७. नाराजके जनपदे प्रहृष्टनटनर्तकाः । उत्सवाश्च समाजाश्च वर्धन्ते राष्ट्रवर्धनाः॥२।६७।१५ राजहीन देशांत सहर्ष नटनर्तकांनी युक्त असे उत्सव होत नाहीत; किंवा राष्ट्रोन्नति करणारे समाजही वृद्धि पावत नाहीत. २६८. नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते ॥ २॥६७।२४ राजहीन देशांत लोकांचे योगक्षेम सुखाने चालत नाहीत. २६९. नाराजके जनपदे स्वकं भवति कस्यचित् । मत्स्या इव जना नित्यं भक्षयान्त परस्परम् ॥२।६७।३१ राजहीन देशांत कोणाचेही जीवन होत नाही. मत्स्य जसे परस्परांचे भक्षण करीत असतात, तसेंच अशा देशांत लोक परस्परांस भक्षण करितात. २७०. नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥४/७/२२ CC-0 Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri