पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २५७. न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति हि॥४।२।१८ बुद्धिभ्रष्ट झालेला राजा सर्व प्रजांचे शासन करू शकत नाही. २५८. न ह्यास्तत्र तिष्ठन्ति न दारा न च बान्धवाः । सुप्रीतो भृत्यवर्गस्तु यत्र तिष्ठति राघव ॥७६४।६ जेथें शत्रु चालून आला असतां संतुष्ट भृत्यवर्ग राहतो-उपयोगी पडतोतेथें द्रव्य, स्त्रिया किंवा बांधव, हे रहात नाहीत-उपयोगी पडत नाहीत. २५९. न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः। यो ह्यर्थ बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥ ५॥४१॥६ स्वल्पही कार्य साधण्याच्या कामी एकच हेतु पुरा होत नाही. ज्याला भरपूर साधनें माहीत आहेत, तोच कार्यसिद्धि करू शकतो. २६०. नाग्निरनौ प्रवर्तते ॥ ५।५५।२२ अग्नीस दग्ध करण्यास अग्नि प्रवृत्त होत नाही. २६१. नाग्निर्नान्यानि शस्त्राणि न नः पाशा भयावहाः। घोराः स्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहाः॥६।१६।७ अग्नि, अन्य शस्त्रे, तसेच पाश, ही आम्हांस भयावह नाहीत; तर स्वार्थतत्पर अशा आमच्या घोर ज्ञाति, ह्याच आम्हांला भयावह आहेत. २६२. नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः । नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा॥२।३९।२९ वीणा जशी तारेवांचून वाजणे शक्य नाही, रथ जसा चक्रावांचून असणे शक्य नाही, तशी शतपुत्रवती स्त्री असली, तरी ती पतीवांचून सुख पावणार नाही. २६३. नात्र कश्चिद्यथाभावं प्राणी समतिवर्तते । तेन तस्मिन्न सामर्थ्य प्रेतस्यास्त्यनुशोचतः।२।१०५।२८ ह्या लोकी कोणीही प्राणी जन्ममरणांचे उल्लंघन करूं शकत नाही. ( असें आहे तरी तो मृतास उद्देशून शोक करितो. ) ( वस्तुतः ) ह्या शोक करणाऱ्याच्या अंमी आपल्या आत्मजनावर येणारा मृत्यु टाळण्याचे सामर्थ्य नसते. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri