पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. १७:४०, २५ ऑगस्ट २०२० (IST) | २४९. न हि ते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम । चातुर्वर्ण्यहितार्थं हि कर्तव्यं राजसूनुना ॥ १।२५।१७ ___हे नरश्रेष्ठा ! ह्या स्त्रीवधास्तव कोणत्याही प्रकारे दया मनांत न आणतां चातुर्वर्ण्याच्या हिताकरितां ( त्वां ) राजपुत्राने हिचा वधच करावा. २५०. न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु । मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्विधाः ॥५॥५१॥१८ ___जी कृत्ये धर्माविरुद्ध आहेत, ज्यांत अनेक अपाय आहेत, जी समूळ घात करणारी आहेत, त्या ठिकाणी तुमच्यासारखे बुद्धिमंत लोक आसक्त होत नाहीत. २५१. न हि धर्माभिरक्तानां लोके किं चन दुर्लभम्।।७।१०।३३ जगांत धर्माच्या ठिकाणीं अनुरक्त असणाऱ्यांना कांहींच दुर्लभ नाही. २५२. न हि प्रकृष्टाः प्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः॥५।३९।३९ ( कार्याविषयी योजना करितांना ) कनिष्ठ श्रेष्ठांना प्रेरणा करित नसून श्रेष्ठच कनिष्ठांना प्रेरणा करितात. २५३. न हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथा सत्यवादिनः। लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥६।१०१।५१ सत्यवादी लोक आपली प्रतिज्ञा कधीही खोटी करीत नसतात. प्रतिज्ञेचे परिपालन हेच मोठेपणाचे लक्षण होय. | २५४. न हि प्रेषयिता तात स्वामी प्रेष्यः कथंचन ॥४।६५।२२ ताता ! जो प्रभु इतरांस ( दूत म्हणून ) पाठविणारा, तो दूतांनी पाठविण्यास योग्य-प्रेष्य-कदापि होणार नाही. २५५. न ह्यतो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम् । यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥२।१९।२२ बापाची शुश्रूषा, आणि त्याचे आज्ञापालन ह्याहून दुसरे कोणतेही श्रेष्ठः धर्माचरण नाही. २५६. न ह्यनिष्टोऽनुशास्यते ॥ ३।१०।२० अनिष्ट मनुष्याला कोणीही हितोपदेश करीत नाही. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri