पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. wwwwww २३३. न विषादे मनः कार्य विषादो दोषवत्तरः। विषादो हन्ति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः॥४॥६४।९ अंतःकरणांत विषाद बाळगू नये. विषाद हा मोठा दोष आहे. पिलाला जसा क्रुद्ध झालेला सर्प, त्याप्रमाणे विषाद हा पुरुषाचा घात करितो. २३४. न शक्तस्त्वं बलाद्धर्तु वैदेहीं मम पश्यतः । हेतुभियायसंयुक्तैर्बुवां वेदश्रुतीमिव ॥ ३५०।२२ ज्याप्रमाणे न्याययुक्त हेतूंनी-प्रमाणांनी सनातन वेदश्रुतीस अन्यथा करणे शक्य नाही, त्याप्रमाणे तूं माझ्या दृष्टीसमोर बलात्काराने वैदेहीला-सीतेला-हरण करण्याविषयी समर्थ होणार नाहीस.. २३५. न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ । सेतुबन्धं समासाद्य विशीर्णं सलिलं यथा ॥ ६।५८।५९ - भग्न झालेल्या सेतुबंधाला गेलेले पाणी स्थिर राहात नाही, त्याप्रमाणे तो ( प्रहस्त ) सेनापति मारला गेला असतां, ते ( राक्षस ) रणभूमीवर राहूं शकले नाहीत. २३६. न शोकपरितापेन श्रेयसा युज्यते मृतः॥४।२५।२ मेलेल्याचे कल्याण शोकयुक्त संतापाने होत नाही. २३७. न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे । नासिराबन्धनाथाय न शराः स्तम्भहेतवः॥२।२३।३१ अमित्रमथ नार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् ।। २।२३।३२ हे माझे बाहु शोभेकरितां नाहीत, धनुष्य अलंकारार्थ नाही, हा माझा खग लांकडांच्या मोळ्यांचे बंध तोडण्याकरितां नाही, किंवा हे माझे बाण स्तंभहेतटेंका देण्याकरितां-नाहीत. शत्रुनाशाकरितां म्हणून या चार वस्तू मी धारण केल्या आहेत. २३८. नष्टं दृष्टा नाभ्यनन्दन्विपुलं वा धनागमम् । पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत ॥२॥४८॥५ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri