पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. ४१ (रामाच्या मागे जाऊन परत आलेल्या लोकांना ) नष्ट झालेल्या विपुल धनाच्या प्राप्तीनेही आनंद झाला नाही; किंवा प्रथमपुत्रलाभ झालेल्या मातेलाही आनंद झाला नाही. २३९. न स क्षमः कोपयितुं यः प्रसाद्यः पुनर्भवेत् ।। पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः॥४॥३२॥२० त्याने पूर्वी केलेला उपकार तूं स्मरत आहेस, व विशेषेकरून जाणत आहेस, त्यापेक्षां ज्याला पुनः प्रसन्न करून घेणे इष्ट आहे, त्या (रामा) ला कोपविणे योग्य नाही. . २४०. न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः। मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः॥६।१८।१५ बाबा ! सर्व बंधु भरतासमान नाहीत, पित्याला सर्व पुत्र मजसारखे नाहीत, तसेच सर्व मित्रही तुजसारखे नाहीत. २४१. न स संकुचितः पन्था येन वाली हतो गतः। समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः॥४।३०।८१ ( मजकडून ) हत झालेला वाली ज्या मार्गाने गेला, तो मार्ग अजून संकुचित झाला नाही. म्हणून हे सुग्रीवा ! तूं केलेल्या संकेताप्रमाणे वाग, आणि वालीच्या मार्गाला अनुसरूं नकोस. २४२. न साम रक्षस्सु गुणाय कल्पते न दानमर्थोपचितेषु युज्यते । न भेदसाध्या बलदार्पता जनाः पराक्रमस्त्वेष ममेह रोचते ॥ ५॥४१॥३ दुर्जनांचे ठिकाणी सामोपाय उपयोगी पडत नाहीं; जे धनसंपन्न असतात, त्यांच्या ठिकाणी दानाचा उपयोग होत नाहीं; जे लोक बलाने गर्विष्ठ असतात, ते भेद उपायाने साध्य होत नसतात. ( या राक्षसांना जिंकण्याकरितां) पराक्रमाचीच योजना करणे मला इष्ट वाटते. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri