पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २२७. न मे दुःखं प्रिया दूरे न मे दुःखं हृतेति च । एतदेवानुशोचामि वयोऽस्या ह्यतिवर्तते ॥ ६।५।५ प्रिया दूर झाली म्हणून मला शोक नाही, किंवा तिचे शत्रूने हरण केलें म्हणूनही मला दुःख नाहीं; परंतु हिचा आयुष्यकाल फुकट जात आहे, म्हणून मला दुःख होत आहे. २२८. नयनाभ्यां प्रसुप्तो वा जागर्ति नयचक्षुषा । व्यक्तक्रोधप्रसादश्च स राजा पूज्यते जनैः॥ ३॥३३॥२१ राजा नेत्र झांकून निजतो, तरी तो नीतिरूप नेत्रांनी जागाच असतो. ज्या राजाचा क्रोध आणि प्रसाद फलरूपाने व्यक्त असतात, तोच राजा जनांना पूज्य होतो. २२९. न राज्यभ्रंशनं भद्रे न सुहृद्भिर्विनाभवः । मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयाममं गिरिम् ।।२।९४१३ हे कल्याणि ! हा रमणीय पर्वत पाहून माझ्या मनाला राज्यभ्रंश अगर सुहृ| दांचा विरह, ह्या गोष्टी दुःखदायक होत नाहीत. २३०, न रामः परदारान्स चक्षुभ्यामपि पश्यति ॥२।७२।४८ तो राम परस्त्री नेत्रांनीही कधी पाहत नाही. | २३१. नवमासधृतं गर्भ भास्करस्य गभस्तिभिः । - पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम् ॥४॥२८॥३ समुद्राचें जल सूर्यकिरणांनी प्राशित करून आज आकाश ( कार्तिकादि) नऊ महिनेपर्यंत धारण केलेला, सर्व लोकांस जीवनभूत, असा ( जल )गर्भ प्रसवत आहे. २३२. न वाक्यमात्रेण भवान्प्रधानो। न कत्थनात्सत्पुरुषा भवन्ति ॥ ६७१।५९ केवळ भाषणाने तूं श्रेष्ठ होणार नाहीस. बडबड करण्याने कोणी सत्पुरुष होत नसतात. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri