पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. २२१. नन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि । आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम् ॥२।१०५।२४ सूर्योदय झाला असतां मनुष्य आनंदित असतात, आणि दिवस अस्ताला गेला असतांही आनंदी असतात. आपल्या जीविताचा नाश होत आहे, हे ते जाणत नाहीत. २२२. न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति । एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मन्यते ॥ २।६१।१६ अन्याने भक्षण करून शेष राहिलेले मांस व्याघ्र भक्षण करू इच्छित नाही, त्याप्रमाणे ( हा ) पुरुषश्रेष्ठ दुसऱ्याने उपभुक्त जें (राज्य), त्याचा स्वीकार करणार नाही. २२३. न पापानां वधे पापं विद्यते शत्रुसूदन ॥ ५॥५२॥११॥ हे शत्रुनाशना ! पाप्याचा वध करण्यांत पाप कधीही लागत नाही. २२४. न पिता नात्मजो वात्मा न माता न सखीजनः। इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥२।२७।६ इहलोकी, आणि परलोकीही स्त्रियांस पिता, पुत्र, आत्मा-स्वतः ती, माता, किंवा सख्या ह्यांतून एकही गति नसून त्यांची गति म्हणजे एक पतिच होय. २२५. न पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति । ख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः॥३।१६।३४ मनुष्ये पित्याच्या स्वभावाचे अनुकरण न करितां मातेच्या स्वभावाचे अनुकरण करितात, म्हणून लोकांत प्रसिद्धि आहे, ती भरताने खोटी करून दाखविली. २२६. न बुद्धिपूर्व नाबुद्धं स्मरामीह कदाचन । SEL मातृणां वा पितुर्वाहं कृतमल्पं च विप्रियम् ॥२।२२।८ मी बुद्धिपूर्वक अगर अज्ञानाने आयांचें, अगर पित्याचें, थोडे तरी कधी अप्रिय केले आहे, असे मला स्मरत नाही. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri